12th board examination : बारावीच्या परीक्षेवरून परतताना 2 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

Hingoli students accident : घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ
Hingoli students accident
बारावीच्या परीक्षेवरून परतताना 2 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यूpudhari photo
Published on
Updated on

आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील बाराशिव येथे बुधवारी (दि.१८) सायंकाळी 6.30 च्या सुमारास आडगाव रंजे येथील दोन विद्यार्थी व त्यांच्यासोबत असलेला पळशी येथील एका विद्यार्थ्याचा दुचाकी अपघात झाला. यामध्ये आडगाव येथील विद्यार्थी माणिक सुदाम पारटकर ऊर्फ मुन्ना व सुदर्शन बापुराव चव्हाण या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बारावी बोर्डाची परीक्षा चालू असताना बुधवारी जवळाबाजार येथे कला शाखेच्या राज्यशास्त्राचा पेपर देऊन आडगावकडे दुचाकीने परतत असताना या विद्यार्थ्यांचा बाराशिव येथे अपघात झाला. यामध्ये माणिक सुदाम पारटकर व सुदर्शन बापूराव चव्हाण या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, करण बेंडे हे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यां‍ना परभणी येथे दाखल करण्यात आले आहे.

Hingoli students accident
10th Exam : ३७३३८ बारावी तर ३२४३३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

अपघातात मृत्यू झालेल्‍या माणिक पारटकर ऊर्फ मुन्ना याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आजी, वडील व भाऊ अपंग आहेत. माणिक हा घरचा एकमेव आधार होता. त्याचेच अपघाती निधन झाल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.

Hingoli students accident
Pimpri Chinchwad Property Tax Collection: मालमत्ताकर जप्ती मोहिम सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news