Cambridge College cheating scandal : केंब्रिज कॉलेजच्या केंद्रावर कॉपीचा प्रकार

विद्यार्थ्यांना सांगितली उत्तरे, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
Cambridge College cheating scandal
केंब्रिज कॉलेजच्या केंद्रावर कॉपीचा प्रकारpudhari photo
Published on
Updated on

वसमत : येथील केंब्रीज कॉलेजच्या परिक्षा केंद्रावर सीसीटीव्ही काही वेळासाठी बंद करून विद्यार्थ्यांना उत्तरे सांगिल्याच्या आरोपावरून एका अनोळखी शिक्षका विरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्या शिक्षकाचा शोध सुरू केला आहे.

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना सुरळीत सुरवात झाली आहे. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तर बहुतांश परीक्षा केंद्रावरील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

Cambridge College cheating scandal
Bear attack : दयाळ धानोरा अस्वल हल्ल्यातील आणखी एका जखमीचा मृत्यू

दरम्यान, वसमत येथील केंब्रीज कॉलेजच्या परिक्षा केंद्रावर 11 फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. या परीक्षा केंद्रावर 19 वर्ग खोल्यांमधून विद्यार्थी परीक्षा देत होते. या परीक्षेच्या वेळी एका शिक्षकाने सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सदर केंद्रावरील विद्यार्थ्यांना गाईडमधून उत्तरे सांगितले तसेच कॉपी करण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Cambridge College cheating scandal
Earthquake mock drill in Latur : भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत मिळाली

या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर परीक्षा केंद्राचे प्रमुख तथा पळसगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव नलगे यांनी 11 फेब्रुवारी रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही 12 वाजून 36 मिनिटे ते 1 वाजून 13 मिनिटांपर्यंत बंद असल्याचे दिसून आले. या प्रकरणात मुख्याध्यापक नलगे यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केली. यामध्ये अनोळखी शिक्षकाने सीसीटीव्ही बंद करून विद्यार्थ्यांना गाईडमधून उत्तरे सांगिल्याचे तक्रारीत नमुद केले.

  • पोलिसांनी अनोळखी शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news