Jewelry robbery Case | दुकान बंद करत असताना सराफाचे 20 तोळे सोने, दीड लाख रु. लंपास

गोकुळ शिरगाव येथे मध्यवस्तीतील घटना
Jewelry robbery Case |
Jewelry robbery Case | दुकान बंद करत असताना सराफाचे 20 तोळे सोने, दीड लाख रु. लंपासFile Photo
Published on
Updated on

उजळाईवाडी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील कमानीजवळ असलेले सराफी दुकान बंद करत असताना अज्ञात चोरट्यांनी 20 तोळे सोने व 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम, असा सुमारे 25 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

प्रकाश आनंदराव भोसले (वय 65) यांनी याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. भोसले यांचे गोकुळ शिरगाव कमानीजवळ सोन्या-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ते दुकान बंद करण्यासाठी आवराआवर करत होते. यावेळी बॅगेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांनी ठेवली होती. ही बॅग दाराजवळ ठेवून ते किल्ली आणण्यासाठी आत गेले असता अवघ्या काही सेकंदातच दोन चोरट्यांनी त्यांची बॅग घेऊन धूम ठोकली.

या बॅगेमध्ये असलेले टॉप्स, कानवेल, बंगाली वाट्या, कानसाखळ्या, राजकोट डोरली, शिंपल्या डोरली, मनी असे साधारणत: 19 तोळे 8 ग्रॅम वजनाचे अंदाजे 23 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम एक लाख 60 हजार, असा सुमारे 25 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. तपास पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news