Hingoli Politics | राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का: आतिश दांडेगावकरांचा भाजपमध्ये प्रवेश

Atish Dandegaonkar BJP | हिंगोली जिल्ह्यात भाजपला बळ; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
Vasmat NCP leader joins BJP
Atish Dandegaonkar BJP Pudhari
Published on
Updated on

Vasmat NCP leader joins BJP

वसमत : जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर यांनी गुरुवारी (दि. २६) मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये अधिकृत प्रवेश केला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) ला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढून राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आतिश दांडेगावकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगली होती. त्यानुसार भाजप नेत्यांशी बैठका झाल्यानंतर मुंबईत प्रवेशाचा मुहूर्त ठरविण्यात आला. प्रवेशापूर्वी त्यांनी वसमत विधानसभा मतदारसंघ येथे समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेतला. तसेच मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी वडील जयप्रकाश दांडेगावकर यांचे आशीर्वाद घेतले. सुमारे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते त्यांच्या सोबत मुंबईला रवाना झाले होते.

Vasmat NCP leader joins BJP
Hingoli Political News : निकालांनी हिंगोलीचे राजकारण बदलले

मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आतिश दांडेगावकर यांचा पक्षप्रवेश जाहीर करण्यात आला. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमास माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर आदी उपस्थित होते.

या प्रवेशामुळे हिंगोली जिल्हा येथे भाजपाला बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. विशेषतः वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघ येथे भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर या निर्णयाचा परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Vasmat NCP leader joins BJP
Hingoli Politics | प्रभारींच्या पायगुणाने काँग्रेसची लागली वाट: प्रज्ञा सातव यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ

आतिश दांडेगावकर यांच्यासमवेत दौलत हुंबाड, रमेश सानप, गणेश कमळू, रत्नमाला शिंदे, स्वप्नील मुळे, शंकर इंगोले, राम झुंझुर्डे, अमोल मुळे, विजय कडतन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

चव्हाणांकडून आतिश यांचे कौतुक

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात आतिश दांडेगावकर यांचे कौतुक केले. सहकार क्षेत्रातील अनुभव असलेले उमदे नेतृत्व भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाला नवे बळ मिळेल, असे ते म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातील शेतीउत्पादनावर आधारित विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी आतिश दांडेगावकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news