Ashadhi Wari 2024 : गजानन महाराजांच्या पालखीचे १३ जूनला प्रस्थान; ‘असा’ असेल पालखी मुक्काम

Gajanan Maharaj Palkhi
Gajanan Maharaj Palkhi

जवळाबाजार; अनिल पोरवाल : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे १३ जून रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. १५ जुलै रोजी पालखीचे पंढरपूरमध्ये होईल. सलग ५५ व्या वर्षी पालखी पंढरपूरकडे रवाना होणार असून पालखीच्या नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

१५ जुलै ते २० जुलै पालखीचा पंढरपूरमध्ये मुक्काम राहणार असून २१ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. या पालखी सोहळ्यात जवळपास ७०० वारकरी, २५० पताकाधारी, २५० टाळकरी, २०० सेवेकरी, २ रूग्ण वाहिका, ३ मालट्रक, ३ अश्व, १ प्रवासी बस सहभागी असतात. गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम १३ जून रोजी पारस येथे होणार आहे. १४ जून भौरद, १५ व १६ जून अकोला, १७ जून वाडेगाव, १८ जून पातुर, १९ जून श्री क्षेत्र डवहा, २० जून श्री क्षेत्र शिरपूर, २१ जून महसला पेन, २२ जून रिसोड, २३ जून सेनगाव, २४ जून दिग्रस, २५ जून जवळा बाजार, २६ जून श्री क्षेत्र त्रिधारा, २७ जून परभणी, २८ जून दैठणा, २९ जून गंगाखेड, ३० जून परळी थर्मल, १ जुलै परळी वैजनाथ, २ जुलै अंबाजोगाई, ३ जुलै बोरी सावरगाव, ४ जुलै कळंब, ५ जुलै तेरणा सहकारी साखर कारखाना, ६ जुलै उपळा, ७ जुलै धाराशिव, ८ जुलै श्रीक्षेत्र तुळजापूर, ९ जुलै उळे, १० व ११ जुलै सोलापूर, १२ जुलै तिरहे, १३ जुलै मानपूर, १४ जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा तर १५ जुलै रोजी पंढरपूर येथे पालखीचे आगमन होईल. १५ जुलै ते २० जुलै पर्यंत पालखीचा पंढरपूर मुक्काम राहणार आहे.

२१ जुलै रोजी पंढरपूर येथून पालखीचे प्रस्थान होणार असून परतीचा मुक्काम करकंब, कुरूडवाडी, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, बीबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिरला नेमाने, आवार, खामगाव मार्ग शेगाव येथे पालखी पोहोचणार आहे. श्री गजानन महाराज संस्थानकडून पालखीची जय्यत तयारी सुरू आहे. पालखीचे जवळाबाजार येथे २५ जुन रोजी आगमन होणार असून येथील जैन परिवाराकडून पालखीतील वारकऱ्यांसाठी भोजणाचे नियोजन करण्यात येणार आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पालखीच्या मुक्कामाचे नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news