Hingoli ASHA workers protest : आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

थकीत वाढीव मानधन देण्याची मागणी, प्रशासनास निवेदन
Hingoli ASHA workers protest
आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन pudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे केंद्र सरकारचे पाच ते सहा महिन्यांचे व राज्य सरकारचे एप्रिल व मे महिन्याचे थकीत वाढीव मानधन तत्काळ खात्यात जमा करावे तसेच ऑनलाईन काम करण्यास सक्ती करण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा, केंद्र सरकारचे पाच ते सहा महिन्यांचा थकीत मोबदला आशा गटप्रवर्तक यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, गटप्रवर्तक यांना शासकीय दर्जा मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना त्वरित कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन आरोग्य विभागात समायोजन करावे, आशा वर्कर व गटप्रवर्तकांना दिवाळी बोनस मंजूर करावे, आशा गट प्रवर्तकांना सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शन विमा 10 लाखांचा द्यावा, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रसूती रजा भर पगारी सहा महिन्यांची द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आयटकच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Hingoli ASHA workers protest
Nanded Protest | नीट परीक्षा, महागाई व शेतकरी प्रश्नांवर किनवटमध्ये डाव्या संघटनांचे आंदोलन
  • प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Hingoli ASHA workers protest
Vaijapur Onion Farmers Protest : कांदाप्रश्नी समृद्धीवर उबाठाचा चक्काजाम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news