Gajanan Maharaj Palkhi : औंढ्यात गजानन महाराज पालखीचे आगमन

'गण गण गणात बोते'च्या गजराने वातावरण झाले भक्तीमय
Gajanan Maharaj Palkhi
Gajanan Maharaj Palkhi : औंढ्यात गजानन महाराज पालखीचे आगमनFile Photo
Published on
Updated on

Arrival of Gajanan Maharaj palanquin at Aundha Nagnath

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : शेगाव येथील संत श्री गजानन महाराज पालखीचे शनिवारी शहरात आगमन होताच भाविकांच्या वतीने गण गण गणात बोतेच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पालखीच्या आगमनानंतर संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरणात उत्साह संचारला होता.

Gajanan Maharaj Palkhi
Gajanan Maharaj Palkhi | जवळाबाजारमध्ये श्री गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

शनिवारी सकाळी ११ वाजता टाळ मृदंगाच्या गजरात श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन झाले. शहरात दाखल झाले. श्री गजानन महाराजांच्या पालखी समोर चालणारे घोडे, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पांढऱ्या शुभ्र पोश ाखात हाती भगव्या पताका घेऊन चालणारे स्वयंसेवक, हाती टाळ घेऊन विठ्ठलाचा तल्लीन झालेले शेकडो वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

शहरात पालखीचे आगमन होताच पिंपळदरी फाट्याजवळ वेशीवर पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून हजारो भाविकांनी संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले.

Gajanan Maharaj Palkhi
Chandrapur Crime News | चोरीप्रकरणातील दोन आरोपी एकाच दिवशी जेरबंद: चंद्रपूर पोलिसांची कामगिरी

याप्रसंगी शहरात प्रत्येक दारासमोर रांगोळी काढून पताका लावण्यात आले होते. दुपारी बारा वाजता पालखीचे श्री नागनाथ मंदिर परिसरात आगमन झाले. यावेळी तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, नायब तहसीलदार प्रवीण ऋमी, मंदिर संस्थानचे सुरेंद्र डफळ, वैजनाथ पवार यांनी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

त्यानंतर महाप्रसादाचे मानकरी नंदू पाटील यांनी श्री गजानन महाराजांची विधिवत पूजा करून नैवेद्य स्वरूपात प्रसाद अर्पण केला. यावेळी माजी आमदार डॉ. संतोष टारफे, विक्की देशमुख, बालाजी हांडे, नामदेव पोटे, माणिकराव पाटील, गजानन जगताप आदी उपस्थित होते. नैवेद्य अर्पण करून पालखीत समावेश असलेल्या स्वयंसेवक व वारकरी यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांना नंदकुमार पाटील यांच्या मार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

पालखी सोहळ्यादरम्यान पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक अफसर पठाण, उपनिरीक्षक यशवंत गुरुपवार, रविकांत हरकाळ, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, पंजाब थिटे, ज्ञानेश्वर गोरे, वसीम पठाण महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक शकील शेख, शैलेश मुविराज, खायमोद्दीन खतीब, तय्यब अली आर्दीनी बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news