

A fire broke out in a grocery store and the materials were burnt
वसमत, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील भोरीपगाव शिवारात मुख्य रस्त्यावर असलेल्या किराणा दुकानाला गुरुवारी सकाळी अचानक आग लागून दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्यानंतर दुकानावरील घरात रा हणारे कुटुंब सुखरुप बाहेर पडले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वसमत शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या भोरीपगाव शिवारात मुख्य रस्त्यावर आत्माराम ससे यांचे किराणा दुकान आहे. या किराणा दुकानाच्या बाजूलाच इतर दोन दुकाने असून या दुकानांवर बांधलेल्या घरात ससे कुटुंबातील पाच सदस्य राहतात. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास आत्माराम ससे हे दुकान बंद करून घरात गेले घेतली होते.
त्यानंतर गुरुवारी सकाळी दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानातील सर्व किराणा सामान जळून खाक झाले. दुकानामध्ये तेल असल्यामुळे आग अधिकच भडकली. या आगीमुळे घरातील जमीन तापू लागली होती.
सदर प्रकार पाहण्यासाठी ससे कुटुंबातील सदस्य खाली उत्तरले असता दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने घरातील सदस्यांना माहिती देऊन घराच्या पाठीमागच्या बाजूने असलेल्या पायऱ्यावरून बाहेर काढले. दरम्यान, या आगाची माहिती मिळताच उपसरपंच अनिल आगलावे, गोरख पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.