

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे १६ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता वारंगा शिवारातील गट क्रमांक ४९४ मध्ये तिघेजण खाजगी मोजणी करत असताना शेत जमिनीतून जाणाऱ्या विद्युत तारेचा शॉक लागून एका जणांचा जागीच मृत्यू झाला.असून दोघा जणांची प्रकृती गंभीर असल्याची पोलिसांकडून समजले आहे. या घटनेत गणेश शंकर जाधव राहणार येडशी तांडा व पंजाब पतंगे राहणार कुर्तडी हे गंभीर जखमी झाले आहेत. आप्पाराव दाजीराव पतंगे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील शेतमालक आप्पाराव दाजीराव पतंगे ६२ वर्षीय हे आपली गट क्रमांक ४९४ मध्ये खाजगी मोजणी करत असताना त्यांच्या शेतातून वारंगा ते बोथी ११०० के, व्ही, ची तंत्र लाईनच्या तारा लोंबकल्या होत्या याच तारांचा शॉक लागून पतंगे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत अन्य दोघाजणांना विद्युत शॉक लागल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरता नांदेड कडे पाठवले.
विद्युत वितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते जमादार शेख बाबर , शिवाजी पवार, राजू जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उतरणीय तपासणी करिता प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा फाटा कडे पाठवून देण्यात आले असून गंभीर झालेल्या दोघांजनावर उपचार सुरू असल्याची जमादार यांनी सांगितले.