Hingoli Crime News : रॉडचा धाक दाखवून ७.९५ लाखांचा मुद्देमाल पळविला

भेंडेगाव रेल्वेगेट जवळील घटना, कुरुंदा पोलिसांत गुन्हा दाखल
Hingoli Crime News
Hingoli Crime News : रॉडचा धाक दाखवून ७.९५ लाखांचा मुद्देमाल पळविलाFile Photo
Published on
Updated on

7.95 lakh worth of valuables were stolen by showing fear of a rod

वसमत, पुढारी वृत्तसेवा :

वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर भेंडेगाव रेल्वेगेट जवळ कंटेनर समोर कार उभी करून रॉडचा धाक दाखवत चौघांनी ७.९५ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुरुवारी पहाटे कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Hingoli Crime News
Saint Gajanan Maharaj Dindi : 'गण गण गणात बोते'च्या गजरात पालखीचे मराठवाड्यात आगमन

हैदराबाद येथून एका वर्षा टान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनर (एमएच २६-सीएच-२९१६) फ्लिपकार्ड कंपनीचे ऑनलाईन साहित्य घेऊन निघाला होता. या कंटेनरमध्ये असलेले साहित्य देगलूर, नांदेड येथे उतरवून त्यानंतर कंटेनर वसमतकडे निघाला होता. वसमत येथे कंपनीचे साहित्य उतरवून पुढे हा कंटेनर हिंगोली व रिसोडकडे जाणार होता.

सदर कंटेनर बुधवारी पहाटे तीन ते चार वाजम्याच्या सुमारास वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर आला असतांना भेंडेगाव रेल्वेगेट जवळ रस्ता खराब असल्याने चालकाने वाहनाची गती कमी केली. या संधीचा गैरफायदा घेत कार मधून आलेल्या चौघांनी कंटेनरसमोर कार उभी केली.

Hingoli Crime News
Hingoli News : षट्‌कोनी सभागृहाचे सिलिंग गळाले

त्यानंतर कारमधील तिघांनी कंटेनरच्या केबीनमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी चालक अजय गायकवाड व क्लिनर यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तीन चोरट्या पैकी एकाने चालक अजय यास बाजूला करून स्वतः कंटेनर चालवित धामणगाव रोडवर निर्जन स्थळी आणला. या ठिकाणी दुसरे वाहन बोलावून कंटेनरमधील १२४५ पार्सल पाकीट पळविले.

कपडे, मोबाईल, टॅब, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू असा ७.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. कंटेनरमधून जाताना चोरट्यांनी चालक अभय व क्लिनरचा मोबाईल सोबत नेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news