MLA Pradnya Satav : आजन्म काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार : आ. प्रज्ञा सातव | पुढारी

MLA Pradnya Satav : आजन्म काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार : आ. प्रज्ञा सातव

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय हा दुदैवी आहे. काँग्रेस पक्षाने चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांना सर्व काही दिले. त्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना दिली. MLA Pradnya Satav

कुणी राजीनामा दिला म्हणून आम्ही बदलणार नाही. आजन्म काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार असल्याचेही सातव यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाने चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांना सर्वकाही दिले. त्यांच्या या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्यातील काँग्रेसजनांना निश्‍चितच धक्‍का बसला आहे. कुणाच्या राजीनाम्याने आमची भूमिका बदलणार नाही. माझ्या पतीने काँग्रेससाठी बलिदान दिले आहे. मी सोनिया गांधी यांची सैनिक आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आजन्म काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सातव यांनी सांगितले. MLA Pradnya Satav

हेही वाचा 

Back to top button