Mahashivratri drone show: महाशिवरात्रीला आकाशात २०० ड्रोन साकारणार शिवरूप

औंढा नागनाथ सज्ज ! ५ किमीवरून दिसणार लेझर शोचा थरार
Mahashivratri drone show
महाशिवरात्रीला आकाशात २०० ड्रोन साकारणार शिवरूपPudhari File Photo
Published on
Updated on

औंढा नागनाथ, हिंगोली : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रविवारी (दि. १५) रात्री आकाशात होणारा भव्य 'ड्रोन लेझर शो'. तब्बल २०० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात शिवरायांची आणि मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार असून, हा नजारा ५ किलोमीटर अंतरावरूनही पाहता येणार आहे.

रविवारी रात्री ८ वाजता भक्तनिवास पार्किंग परिसरात हा लेझर शो होणार आहे. जमिनीपासून सुमारे १५० मीटर उंचीवर २०० ड्रोन एकाच वेळी झेपावतील. २० ते ३० मिनिटांच्या या शोमध्ये मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, नागनाथाची पिंड, आणि शंकर-पार्वतीची मूर्ती आकाशात साकारली जाईल. तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गाथा आणि मंदिराचे महत्त्वही यात मांडले जाईल.

Mahashivratri drone show
Teachers salary revision case : निवड वेतनश्रेणीसाठी शिक्षकांची खंडपीठात धाव

शनिवारी (दि. १४) मध्यरात्री १२:३० वाजता आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा होईल. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे, मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिहर भोपी व इतर मान्यवर उपस्थित राहतील. रविवारी पहाटे २ वाजता मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. देशभरातून येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या पश्चिम दरवाजातून प्रवेश दिला जाईल. गर्दीमुळे अभिषेक पूजा बंद ठेवण्यात आली असून, दर्शनासाठी साध ारण ३ तासांचा वेळ लागू शकतो. नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना २५ क्विंटल साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.

वेबसाईटचे लोकार्पण आणि हायटेक सुरक्षा

यावेळी नागनाथ मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे देश-विदेशातील भाविकांना आता घरबसल्या ऑनलाईन दर्शन आणि अभिषेकाचे बुकींग करता येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी पाहणी केली आहे. गर्दीवर नजर ठेवण्यासाठी परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, दोन ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. यात्रेत २ लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे.

Mahashivratri drone show
Police Patil recruitment : पोलिस पाटील भरतीत पारदर्शकतेसाठी पॅनल बदलीचा फंडा

पालखी आणि रथोत्सव

रविवारी सायंकाळी ७ वाजता नागनाथाची पालखी काढली जाईल. ही पालखी शहरातील राऊळेश्वर मंदिरात जाऊन परत येईल. तर यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव बुधवारी (दि. १८) रात्री होणार असून, यावेळी १ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने यात्रेची सांगता होईल.

ड्रोन शोसाठी व्हीआयपी स्टेज

रविवारी रात्री होणाऱ्या ड्रोन शोसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. हा शो पाहण्यासाठी व्हीआयपी स्टेज तयार करण्यात आले आहे. आकाशात १५० मीटर उंचीवर रंगणारा हा प्रकाशयोजनांचा खेळ औंढ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news