

Vivah Muhurat 2026 Date List In Marathi
जवळाबाजार : नवीन वर्षांत म्हणजे २०२६ मध्ये शुभविवाह सोहळ्यास जवळपास ११० मुहूर्त असल्याने भावी वधुवराच्या कुटुंबियांकडून आतापासून लग्नाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यातील मकर संक्रांतीच्या सणानंतर शुभविवाह सोहळ्यास मोठ्याप्रमाणात सुरूवात होत असते.
जानेवारी : २० , २३ , २४ , २५ , २६ , २८ , २९
फेब्रुवारी : ३ , ५ ,६ , ७ , ८ ,१० ,११ ,१२ ,२० ,२२ ,२५ २६
मार्च : ५ , ७ , ८ ,१४ , १५ , १६
एप्रिल : २१, २६, २८ ,२९ , ३०
मे : १, ३ , ६ ,७ , ८ , ९ , १०, १३ , १४
जून १९ , २० , २३ , २४ , २७
जुलै १ २ ३ ४ ७ ८ ९ १९ २० २१ २४ २६ २९ ३० ३१
ऑगस्ट : ३ ४ ५ ७ ८ ९ १५ १६ १८ २० २३ २६ ३० ३१
सप्टेंबर : ४ ५ १३ २१ २३ २६
ऑक्टोंबर : १२ १४ १६ १९ २० २१ २४ २५ २६ २९
नोव्हेंबर : ३ १२ १५ १६ १७ २५ २६
डिसेंबर : २ ३ ४ ५ १० १२ १३ १४ १५ १८ २७ २८ ३० ३१
2026 मध्ये जवळपास ११० शुभविवाह सोहळ्यास तिथी असून या मध्ये गुरू अस्तातील, शुक्र अस्तातील, सिंहस्थ गुरू मधील सुध्दा शुभविवाह सोहळ्याच्या तिथी आहेत.
एकंदरीत आगामी नुतन वर्ष २०२६ मध्ये मोठ्याप्रमाणात शुभविवाह सोहळ्याच्या तिथी असल्याने वधूवरांसाठी पर्वणी आहे. आता पासून लग्नाचे नियोजन वधु व वराकडील मंडळीकडून सुरू करण्यात आले आहे. मंगल कार्यालय, डेकोरेशन, कॅटरिंग, ढोल, डीजेच्या साठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. विवाह सोहळ्याचा विविध पत्रिका व्यवसाय, कापड बाजार पेठ, फटाके आदी व्यवसायात उलाढाल होणार आहे.