हिंगोली : वसमत तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 Earthquake
Earthquake
Published on
Updated on

वसमत, दांडेगाव: पुढारी वृत्तसेवा: वसमत तालुक्यातील अनेक गावांना आज (दि.२२) दुपारी २ वाजून ८ मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तालुक्यात मागील ७ ते ८ वर्षापासून भूकंपाचे सौम्य धक्के अधूनमधून जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिरळी, वापटी, कुपटी, डोनवाडा, कुरुंदा, सेलू, आंबा यासह आदी गावात ७ ते ८ वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जमीन हादरणे, भूगर्भातून आवाज येणे, असे प्रकार घडत आहेत. आज दुपारी २ वा ८ मिनिटाला पुन्हा सौम्य धक्के अनुभवण्यास आले. खाजनापूर वाडी, आंबा, कुरुंदा यासह इतर गावांना भूगर्भातून आवाज येत जमीन हादरत असल्याचे जाणवले. यात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती तलाठी एन. गिते यांनी दिली.

तसेच दांडेगाव परिसरातील रामेश्वर, सालापूर, दिग्रस बुद्रुक, बागल पारडी जवळपासच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसले. दांडेगाव तसेच परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुन्हा आज भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news