हिंगोली: भुईमुगाच्या शेंगा काढताना कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

File Photo
File Photo
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील बळेगाव शिवारातील कालव्यात वाहून गेलेल्या चौदा वर्षीय मुलाचा मृतदेह आज (दि.१९) पहाटे पळशी शिवारात सापडला. उमेरखान सत्तारखान (१४, रा. वसमत) असे मुलाचे नाव आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

वसमत येथील मदिना चौक भागातील उमेरखान सत्तारखान हा गुरुवारी त्याच्या कुटुंबियांसह बळेगाव शिवारातील शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला तहान लागल्यामुळे तो कालव्यावर पाणी पिण्यासाठी गेला होता. मात्र पाणी पित असताना त्याचा पाय घसरून तो कालव्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तसेच कालव्यातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो पाण्यात वाहून गेला. सदर प्रकार तेथे असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला वाचविता आले नाही.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, जमादार जीवन गवारे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. वसमत येथील नागरिक, बळेगावचे गावकरी व पोलिसांनी उमेरखान याचा शोध सुरु केला होता. आज पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह पळशी शिवारातील कालव्यामध्ये आढळून आला आहे. त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. या प्रकरणी सय्यद तय्यब यांनी आज हट्टा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार गवारे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news