छत्रपती संभाजीनगर : निर्दयी बापाने दोन चिमुकल्यांना ढकलले विहिरीत, एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : निर्दयी बापाने दोन चिमुकल्यांना ढकलले विहिरीत, एकाचा मृत्यू
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारूच्या व्यसनामुळे रोज पती-पत्नीत भांडण व्हायचे. या त्रासाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी पत्नी दोन्ही मुलांना पतीकडे सोडून निघून गेली. दरम्यान यानंतर  मुलांचा सांभाळ करणाऱ्याची  जबाबदारी असणाऱ्या मद्यपी बापाने शुक्रवारी दारूच्या नशेत टोकाचे पाऊल उचलले. ९ आणि ७ वर्षांच्या दोन मुलांना सोबत घेऊन घरापासून जवळच असलेल्या विहिरीकडे नेले आणि अचानक त्यांना विहिरीत ढकलून दिले. यात सात वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर मोठ्याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडकाे ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

श्रेयस राजू भाेसले (वय ७) असे मृत मुलाचे तर शिवम राजू भोसले (वय-९) असे बचावलेल्या मुलाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक माहितीनुसार, राजू प्रकाश भाेसले (३३) हा चौधरी कॉलनीत आई, वडील व दोन मुलांसह राहतो. तो चिकलठाणा येथे वेल्डींगची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. दरम्यान, राजूला दारूचे व्यसन लागल्याने त्याचे पत्नीसोबत दररोज खटके उडायचे. त्याच्या त्रासाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हापासून तो दोन्ही मुलांचा सांभाळ करीत होता. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्यासुमारास तो घरी आला. घरापासून २०० मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना घेऊन गेला. दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून तो परत निघाला.

अन् अनिरुद्ध दहिहंडे मदतीला धावला

राजू भोसलेने दोन्ही मुलांना विहिरीत ढकलल्यावर तो निघून गेला. विहिरीतून मुलांच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने तेथेच राहणाऱ्या अनिरुद्ध दहिहंडे याने तिकडे धाव घेतली. त्याने कसलाही विचार न करता विहिरीत उडी मारली. त्यामुळे शिवमला वाचविण्यात त्याला यश आले. मात्र, श्रेयसचा त्याला शोध घेता आला नाही. दुर्दैवाने श्रेयसचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे यांनी भेट दिली. ते उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी करीत होते.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news