गंगाखेड : मन्नाथ तलावात २५ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

गंगाखेड : मन्नाथ तलावात २५ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : पोहणे शिकण्यासाठी शहरानजीकच्या मरगळवाडी येथील मन्नाथ तलावात उतरलेल्या एका २४ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.२९ मे) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. संदीप शिवलिंगप्पा काडवदे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील माखणी येथील संदीप हा रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास शहरा नजीकच्या मरगळवाडी येथील मन्नाथ तलावात पोहायला शिकण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने संदीप याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेच्या काही कालावधीतच त्याचे चुलत बंधू व नातेवाईकही तेथे पोहण्यासाठी आले होते. संदीप याने आपल्या कपड्या शेजारी स्वतःचा मोबाईल ठेवला होता, जो सतत वाजत होता.

पोहण्यासाठी आलेल्या मुलांना मोबाईलची रिंग ही संदीपचीच असल्याचे जाणवले. त्यामुळे ते कपड्याजवळ गेले असता सदरील कपडे व मोबाईल हा संदीपचाच असल्याची खात्री पटली. हे समजल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. ही बाब मासे खरेदीसाठी आलेल्या भोई समाजातील नागरिकांना त्यांनी सांगितली. त्यांनंतर संदीपचा शोध घेण्याचा प्रयत्न सर्वांनी सुरू केला. तब्बल एक ते दीड तासाने संदीपचा मृतदेह सापडला. दरम्यान संदीपच्या दुर्दैवी मृत्यूने पाळवदे परिवारासह माखणी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी ५ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात तालुक्यातील माखणी येथे संदीप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news