Man and Dog : १७ देशात पर्यटन, ‘ते दाेघे’ स्वप्नाच्‍या जवळ आले; पण नियतीच्‍या मनात वेगळेच हाेते | पुढारी

Man and Dog : १७ देशात पर्यटन, 'ते दाेघे' स्वप्नाच्‍या जवळ आले; पण नियतीच्‍या मनात वेगळेच हाेते

पुढारी ऑनलाईन डेस्क : तरुणाई म्‍हटलं की, स्‍वप्‍न आलंच. हे वयच स्‍वप्‍न साकारायचं असते. इंजिनियर, डॅाक्टर, बिझनेसमन, स्पोर्ट्समन असं कोणतं ना कोणतं तरी स्वप्न प्रत्येक युवक बाळगत असतात. पर्यटन हे देखील एक मोठे स्वप्न युवक बाळगताना दिसतात. अशाच एका युवकाने आपल्‍या लाडक्‍या कुत्र्यासह  ब्राझील ते अलास्का असा प्रवास पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले होते; पण त्याचं हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच शेवटच्‍या टप्‍प्‍यात दाेघांवरही काळाने घाला घातला. (Man and Dog)

 

Image

सोशल मीडियावरील चर्चेतील युवक आणि त्याचा पाळीव कुत्रा असा दोघांचा कार अपघातात मृत्यू झाला. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं स्वप्न याने बाळगलेलं होतं. या 29 वर्षीय तरूणाचे जेसी कोझ असे नाव आहे. शेर्स्ट हा त्याचा पाळीव कुत्रा होता. या दोघांचाही ब्राझील ते अलास्का असा प्रवास करण्याचे त्याचे मोठे स्वप्न होते.

1978, बीटल फोक्सवॅगन ही कोझ याची आवडती कार होती. त्याच्या फोर्ड एस्केप कारला अमेरिकेतील ओरेगॉन येथे भीषण अपघात झाला. जेसी कोझ आणि त्‍याचा पाळीव कुत्रा शेर्स्ट यांचा मृत्‍यू झाला. तर कारची महिला चालक या अपघातातून थोडक्यात बचावली.

Volkswagen Beetle (Famous Photo) - On This Day

२०१७ मध्‍ये प्रवासाला प्रारंभ

 जेसी कोझ याने  आपला लाडका कुत्रा शेर्स्ट याच्‍याबराेबर  प्रवासाचा शुभारंभ २०१७ मध्ये केला. प्रवासाचा हा आवडता छंद. त्याच्यासेबत जवळपास १७ देशांचा प्रवास कोझ याने केला आहे. ब्राझील ते अलास्का हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रवासाचे नियोजन त्याने आखलेले होते. 2020 मध्ये अलास्कापर्यंतचा त्याचा प्रवास अर्धवट राहीला होता. यावेळी त्याला कोविड-19 महामारीच्या निर्बंधांमुळे यूएस-मेक्सिको सीमा ओलांडण्यास रोखले. मायदेशी परत जाण्यास भाग पाडल्याने तो नाराज झाला. एवढे होऊनही त्याने हार मानली नव्हती. 2022 च्या जानेवारीमध्ये त्याने पुन्हा ब्राझील ते अलास्का असा प्रवास सुरू केला. फेब्रुवारीमध्ये तो अमेरिकेत पोहोचला.

आम्ही सूर्यास्त होईपर्यंत नेहमी एकत्र राहू… काेझची पाेस्‍ट ठरली अखेरची

कोझ याने अपघातीपूर्वी  चार दिवस आधी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केले होती. यात त्याने आपल्या कुत्र्यासोबत सूर्यास्तासमोरचा एक फोटोही पोस्ट केला. कॅप्शनमध्ये कुत्र्यास उद्देशून त्याने लिहिले, “मी त्याला सांगितले की तो माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, मी त्याच्या सहवासाशिवाय राहू शकत नाही. तो फक्त जीभ बाहेर काढतो आणि हसतो. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही. माझ्या मित्राची साथ मला मोलाची आहे. जोपर्यंत तो माझ्यावर अवलंबून आहे तोपर्यंत आम्ही सूर्यास्त होईपर्यंत नेहमी एकत्र राहू.

ब्राझीलच्या या हरहुन्नरी तरूणाने त्याच्या 5,89,000 Instagram चाहत्यांसाठी त्याच्या प्रवासातील फोटो शेअर केले. या फोटोंना त्याने जवळपास 1.4 दशलक्ष फॉलोअर्स देखील मिळवले हाेते.

हेही वाचा

Back to top button