

घाटंजी (जि.यवतमाळ), पुढारी वृत्तसेवा : कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत अपहार केल्याप्रकरणी राेखपाल गणपत रामेश्वर आसुटकर याचा जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांनी फेटाळला. दरम्यान, आसुटकर विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत फिर्यादी गिरजा श्रीकृष्ण आडे यांनी 2020 मध्ये खाते उघडले होते. या शेतातील पीक विक्रीतून आलेली रक्कम वेळोवेळी टाकत असे. फिर्यादी गिरजा यांनी १४ मे २०२० रोजी ४९ हजार ९९९ रुपये व १६ जुलै २०२० रोजी ५० हजार रुपये बँकेत जमा केले होते. फिर्यादीच्या मुलीचे लग्न असल्याने फिर्यादी गीरजा या पैसे काढण्यासाठी 3 जानेवारी 2022 बँकेत आल्या. नव्याने रुजू झालेले रोखपाल यांनी खात्याची पाहणी केली असता खात्यात ५० हजार रुपये कमी असल्याचे रोखपालाने फिर्यादीस सांगितले. त्यामुळे फिर्यादीला धक्का बसला.
बँकेत रक्कम बचत खात्यात जमा करताता गणपत आसुटकर हा बँकेत कार्यरत होते. कुर्ली येथील पांडुरंग मडावी याची 50 हजार रुपये सुद्धा बँकेत जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघांचीही फसवणुक झाली. या प्रकरणाची लेखी तक्रार गिरजा श्रीकृष्ण आडे हिने पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली. या वरुन ठाणेदार विनोद चव्हाण यांनी आरोपी रोखपाल गणपत रामेश्वर आसुटकर विरुद्ध भादंवि कलम 409, 34 संगणमत करुन अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला हाेता.
पारवा पोलीस आरोपी यांस अटक करण्यासाठी त्याच्या मुळ गांवी वणी येथे गेले हाेते. आरोपी फरार झाला असून, या प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. उदय पांडे यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीची बाजू अँड. एस. एस. मांढळे यांनी मांडली.
हे ही वाचलं का