जि. प. उपाध्यक्ष गायकवाड यांची आरोग्य केंद्रांना अचानक भेट

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड यांनी दिला.
dharashiv news
जि. प. उपाध्यक्ष गायकवाड यांची आरोग्य केंद्रांना अचानक भेटfile photo
Published on
Updated on

Zilla Parishad Vice-President Gaikwad Pays Surprise Visit to Health Centers

लोहारा, पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड यांनी दिला. लोहारा तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देत पाहणी केली. या अचानक भेटीमुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

dharashiv news
Nanded News : उपजिल्हा रुग्णालय रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत

श्रीमती गायकवाड यांनी माकणी प्राथमिक आरोग्य केंद्रासह सालेगाव, लोहारा खुर्द आणि मार्डी येथील उपकेंद्रांना भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी उपस्थिती नोंदवही तपासली, औषधसाठा पाहिला तसेच स्वच्छतेबाबत सूचना दिल्या. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ग्रामीण जनतेला योग्य उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांची गैरसोय होत असेल, तर ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. या भेटीचा मुख्य उद्देश आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि जबाबदार बनवणे हा असून, त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या.

dharashiv news
बीड जिल्ह्यात श्वानदंशाच्या वाढत्या घटना चिंताजनक

या अचानक पाहणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून मात्र या कडक भूमिकेचे स्वागत होत आहे. ग्रामीण आरोग्य सेवेत शिस्त आणि गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news