

Yuva Sena apologizes after corporator's defection!
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा प्रभाग क्रमांक १९ मधून मशाल चिन्हावर निवडून आलेल्या ज्ञानेश्वरी राज निकम यांनी नागरिकांची भारतीय जनता पक्षात प्रवेश जिल्हाप्रमुखाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेना दिलगिरी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पक्षांतराबद्दल शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी प्रभागातील नागरिकांची जाहीर माफी मागितली आहे.
मशाल चिन्हावर विश्वास ठेवून प्रभागातील मतदारांनी ज्ञानेश्वरी निकम यांना निवडून दिले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा गेल्याची भावना रवी वाघमारे व्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी एका विशिष्ट विचारधारेवर आणि पक्षाच्या चिन्हावर विश्वास ठेवून मतदान केले होते.
त्यामुळे या पक्षांतरातून त्यांच्या मताचा योग्य सन्मान राखला गेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 'प्रभागातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू शकलो नाही, याची खंत आहे. मतदारांच्या मताचा मान राखला गेला नाही, याबद्दल भी प्रभागवासीयांची जाहीर माफी मागतो,' अशा शब्दांत रवी वाघमारे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आणि त्यातून व्यक्त केलेला विश्वास यांचा लोकप्रतिनिधींनी आदर राखणे अपेक्षित असते. मात्र, निवडून आल्यानंतर झालेल्या पक्षांतरामुळे मतदारांच्या भूमिकेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.