Dharashiv News : शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमातच धाराशिव येथे महिलेने घेतले पेटवून

पोलिसांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Fire
FirePudhari
Published on
Updated on

Woman Sets Herself Ablaze During Official Flag-Hoisting Ceremony in Dharashiv

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना एका महिलेने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत ती महिला सुमारे ५० टक्के भाजली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Fire
Jalna News : अत्याचारग्रस्त कुटुंबांना शासकीय सेवेचा आधार

संबंधित महिलेने यापूर्वीच आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन प्रशासनाला दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्या निवेदनाची दखल घेतली गेली नसल्याची चर्चा असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Fire
वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, बेबी पाटील या भूविकास बँकेत कर्मचारी होत्या बँकेवर प्रशासक नेमल्यानंतर त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला होता. "आम्हाला बँकिंग क्षेत्रात समाविष्ट करा व थकीत वेतन द्या," अशी त्यांची मागणी होती. वेतन प्रलंबित राहिल्याने त्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावेळी शासकीय मध्यवर्ती कार्यालयासमोर हे पाऊल उचलले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news