

धाराशिव : शहरातील एका हॉटेलमध्ये 19 वर्षीय विवाहित महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी गेलेल्या पती-पत्नीला तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर एका आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान इतर दोन तरुणांनी पीडितेच्या पतीला मारहाण करण्यात आली. तसेच घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच संबंधित कलमांनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले असून तपास सुरू आहे.