

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : खोली भाड्याने मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 34 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 34 वर्षीय महिलेला संशयिताने खोली भाड्याने करून देण्याचे सांगितले. त्यानंतर तिला म्हशीच्या गोठ्यावर बोलावून तेथून जेवणासाठी हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये शीतपेयामध्ये मद्य मिसळून पाजल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पीडितेने 10 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपीचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.