कळंब तालुक्यात शांततेत मतदान

कार्यकर्त्यांची लगबग तर उमेदवार चिंतेत
Kalamb taluka ZP Election
Vote Pudhari
Published on
Updated on

Voting took place peacefully in Kalamb taluka

कळंब, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात आठ जिल्हा परिषद गटाची व सोहळा पंचायत समिती गणाची निवडणूक शांततेत पार पडली सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान धिम्या गतीने सुरू होते. त्यांनंतर साडे पाच पर्यंत मतदारांच्या रांगा दिसत होत्या. उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी जोरदार पाठपुरावा केलेला दिसून येत होता. तर प्रत्येक पक्षाच्या उमेदवार व त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक प्रत्येक बुथवर ठाण मांडून बसले होते.

Kalamb taluka ZP Election
Dharashiv ZP Election | उमरगा तालुक्यात मतदान केंद्राकडे साहित्य पोहोचविण्याची लगबग; ९८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

तर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कोण पुढे जाणार कोण मागे रहाणार याची चर्चा करत होते. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. परंतु सर्वच एकमेकांना सहकार्य करत असलेले दिसुन आले त्यामुळे लोकशाहीचा हा उत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडल्याचे दिसून आले. दुपारी चार वाजेपर्यंत तालुक्यात ४२८४५ पुरूषांनी तर ३९९१८ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण ५०.७७ टक्के मतदान झाले होते. खामसवाडी येथे सात वाजेपर्यंत मतदान चालू होते. ५:३० पर्यंत साध ारणतः ६५ ते ७० टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे.

शिवसेनेचे नेते अजित पिंगळे यांनी त्यांचे गाव पाथर्डी येथे मतदानाचा हक्क बजावला तर उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन काळे यांनी डिकसळ येथे माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड यांनी आवाड शिरपुरा येथे तर भाजपचे पश्चिम तालुकाध्यक्ष दत्ता साळुंके यांनी घारगाव तर पुर्व तालुकाध्यक्ष अरूण चौधरी यांनी आथरडी येथे तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा तुषार वाघमारे यांनी बाभळगाव येथे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रा शिवाजीराव लकडे यांनी सौंदणा (अंबा) येथे बाजार समितीचे संचालक विकास बारकुल यांनी येरमाळा येथे शिवसे-नेच्या महीला जिल्हाध्यक्ष भारती गायकवाड यांनी पिंपळगाव डोळा येथे तर संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड यांनी भाटशिरपुरा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

Kalamb taluka ZP Election
Mahatma Phule Jan Arogya Yojana : 2,483 रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार

तरुणांची फौज

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी राजा हरिश्चंद्र पिंपरी आणि पंचक्रोशीतील शेकडो तरुण या ठिकाणी आपली कामे सोडून वाढ करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी, तसेच आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी मेहनत घेत असतात. या तरुणांच्या फौजेमुळे या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचे संरक्षणही होत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news