Dharashiv ZP Election | उमरगा तालुक्यात मतदान केंद्राकडे साहित्य पोहोचविण्याची लगबग; ९८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदी साहित्य घेऊन केंद्र स्तरीय पथके, अधिकारी व कर्मचारी रवाना
Umarga Election Staff Appointment
उमरगा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली Pudhari
Published on
Updated on

Maharashtra Local Body Elections

उमरगा : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानासाठी शुक्रवारी (दि . ६) दुपारी बारापासून मतदान केंद्र स्तरीय पथके मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाली. शनिवारी (दि.७) सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान तर सोमवारी (दि ०९) मतमोजणी होणार आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्ष व अपक्ष मिळून जि. पच्या ०९ गटात ३१ तर पं स.च्या १८ गणात ५३ असे ८४ उमेदवार  आखाड्यात उतरले आहेत. दरम्यान आज सकाळी शहरातील अंतु बळी सभागृहातून गट व गणांच्या मतदानासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदी साहित्य घेऊन केंद्र स्तरीय पथके, अधिकारी व कर्मचारी रवाना झाले.

Umarga Election Staff Appointment
Dharashiv News : दरवर्षी स्फोट, तरीही प्रशासन ढिम्म

तालुक्यात यावेळी १ लाख ७२ हजार ६९८ इतके मतदार असून यात पुरूष ९१ हजार २९७, महिला ८२ हजार ३९८ तर इतर ०३ मतदार १९६ केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त ९८० कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य १९६ मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या १४ बस, १४ स्कूल बस व खाजगी ११ अशा ३९ वाहनांची सोय करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन बंद पडण्यासह काही अडथळे निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके मतदानाच्या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी २० राखीव पथकासह १८ क्षेत्रीय अधिकारी, १९ निवडणूक कार्यालयीन पथक, ५ चेक पोस्ट तसेच फिरत्या तीन पथकाची पाळत राहणार आहे.

Umarga Election Staff Appointment
Dharashiv News : भूजल व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक : जिल्हाधिकारी पुजार

तसेच सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या मतदानानंतर सर्व मतपेट्या शहरातील अंतुबळी सभागृहात जमा करण्यात येणार असून सोमवारी सकाळी दहा वाजल्या पासून १८ टेबलावर मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक विभागा कडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news