US - Iran war | अमेरिका - इराण युद्धाचा फटका, उमरगा येथील दोन वयस्कर दांपत्ये दुबई येथे अडकली!

सध्या सुरक्षित असल्याचे चित्रफितीद्वारे सांगितले, मदतीसाठी केले आहे सरकारला आवाहन, 1 मार्च रोजी परतण्याचे होते नियोजन
US - Iran war
दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले व अडकून पडलेले दळगडे व माशाळकर कुटूंब
Published on
Updated on

उमरगा : अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने भयानक युद्धजन्य स्वरूप धारण केले असून, जगभरात भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे. या अस्थिर परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर झाला असून, अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील भयानक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उमरगा येथील दोन दांपत्य सध्या दुबई येथे अडकले आहेत.

शहरातील आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे, सुजाता दळगडे तसेच महाबीज कंपनीचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवानंद माशाळकर व मीनाक्षी माशाळकर हे सोलापूर येथील एका टुर्स कडून मुंबई येथून पाच दिवसांच्या पर्यटनासाठी २४ फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. त्यांनी तेथील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. १ मार्च रोजी भारतात परतण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, इस्रायल–इराण संघर्ष तीव्र झाला आणि भयानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.

US - Iran war
Iran Us Israel News: युद्ध पेटलं, विमानं खोळंबली; एअर इंडिया, इंडिगोच्या प्रवाशांसाठी Advisory

अचानक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद करण्यात आली. त्यामुळे दोन्ही दांपत्य दुबईतच अडकले आहे. त्यांनी उमरगा शहरातील या दाम्पत्यांचे मित्र तथा रोटरीचे माजी अध्यक्ष सतीश साळुंखे यांना चित्रफितीद्वारे आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. तथापि, अनिश्चित काळासाठी मुक्काम वाढल्याने त्यांच्या जवळील आर्थिक तरतूद संपली असल्याचे समजते. राहण्याची तसेच मायदेशी सुरक्षित परतण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनस्तरावर तातडीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी संबंधित दांपत्यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे केली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने त्वरीत मदतीसह सुरक्षित मायदेशात परतण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news