Iran Us Israel News: युद्ध पेटलं, विमानं खोळंबली; एअर इंडिया, इंडिगोच्या प्रवाशांसाठी Advisory

Air India Advisory: एअर इंडियाने (Air India) ने मध्य पूर्वेकडील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली
aeroplane airplane
aeroplane airplanePudhari
Published on
Updated on

Iran Us Israel News middle east flights today

नवी दिल्ली : इराणवरील अमेरिका आणि इस्राईल यांच्या संयुक्त मोहिमेने जगभरातील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एअर इंडियाने (Air India) ने मध्य पूर्वेकडील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली असून जगभरातील इतर कंपन्यांनी विमान सेवा विलंबाने सुरू असतील अथवा मार्गात बदल होणार असल्याने प्रवाशांनी त्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

शनिवारी अमेरिका- इस्राईलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरात इस्राईलवर क्षेपणास्त्रे डागली. तर आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला. याचा मोठा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे.

एअर इंडियाने काय म्हटले आहे?

एअर इंडियाने सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केली आहे. यात असे म्हटले आहे की, इराण- इस्राईलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व आशियाकडे जाणारी एअर इंडियाची सर्व उड्डाणे 1 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देणार असून आमची टीम प्रवाशांच्या मदतीसाठी तत्पर आहे. सर्व प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी एअर इंडियाच्या वेबसाईटवर विमानाची स्थिती (Flight Status) तपासावे. किंवा +91 1169329333, +91 1169329999 या हेल्पलाईन क्रमांकवर संपर्क साधावा. ही सेवा 24 तास सुरु आहे.

इंडिगोने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. ‘इराण, संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशांमधील हवाई हद्दीतून प्रवासी विमानांच्या वाहतुकीवर निर्बंध आल्याने विमान सेवेला फटका बसला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून इराण आणि मध्य पूर्व आशियात जाणारी सर्व विमानांची उड्डाणं रात्री 12 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

'एमिरेट्स'ची दुबईतील सेवा तात्पुरती बंद

एमिरेट्स एअरलाइन्सने दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणं तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Virgin Atlantic

Virgin Atlantic एअरलाइन्सने लंडन- दुबई विमान सेवा बंद केली आहे.

रशियन एअरलाइन्स

रशियन एअरलाइन्सने इराण आणि इस्राईल येथे जाणारी सर्व विमाने रद्द केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news