'Trimurti Bhavan' उमरग्यात ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेवांचे पुरातन एकमेव हेमाडपंथी मंदिर

श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी
'Trimurti Bhavan' उमरग्यात ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेवांचे पुरातन एकमेव हेमाडपंथी मंदिर
Published on
Updated on

Umarga is the only ancient Hemadpanthi temple dedicated to the trinity of Brahma, Vishnu and Mahesh.

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : शहराचे ग्रामदैवत असलेल्या व ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा एकत्रित आदिवास असलेले एकमेव पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर आहे. येथे वर्षभरात सोमवार, अमावस्या, महाशिवरात्री, यात्रा व संपुर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाची मांदियाळी असते.

'Trimurti Bhavan' उमरग्यात ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेवांचे पुरातन एकमेव हेमाडपंथी मंदिर
Dharashiv News : राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको : आ. कैलास पाटील

शहराच्या उत्तरेस साधारणतः एक हजार वर्षापूर्वी पाषाण काळ्याभोर दगडातून साकारलेल्या हेमाडपंती मंदिरात ब्रम्हा, विष्णू व महेश या त्रिमूर्तीचा एकत्रित संगम असलेले शहराचे ग्रामदैवत महादेव मंदिराची रचना सर्वांना आकर्षण करणारी आहे. प्राचीन काळात उमरगा शहराची आनंदीपुर म्हणून ओळख होती. त्याकाळी या हेमाडपंती मंदिरास 'त्रिमूर्ती भवन' संबोधले जात असल्याची माहिती जाणकार सांगतात. प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या हेमाडपंती मंदिराची रचना विलोभनीय असून मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच्या दर्शनी बाजूला विष्णु भवन, उजव्या बाजूला ब्रम्हदेव भवन तर डाव्या बाजूला महादेव भवन अशी मंदिराची रचना तयार करण्यात आली आहे.

हे पाहताच साक्षात जणु ब्रम्हांडाची रचना केली असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण मंदिराचा गाभारा सभामंडप व छत काळ्या पाषाण दगडामध्ये करण्यात आलेली कोरीव कलाकृती लक्षवेधक आहे.

'Trimurti Bhavan' उमरग्यात ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेवांचे पुरातन एकमेव हेमाडपंथी मंदिर
Dharashiv : वाशी तालुक्यात पावसाचा जोर; सोयाबीनला दिलासा

त्यात विष्णुचे पार्शद (दास), शिवगण व ब्रम्हदेवाचे सेवक यासह मंदिराच्या दहा दिशेला देवांचे दहा अवतार आहेत. या हेमाडपंती मंदिराची उभारणी एका रात्रीतून करण्यात आली आहे. तर प्रभू रामचंद्रांच्या युगात शिवलिंगाची स्थापना झाली असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

प्रतिवर्षी श्रावण महिन्यात मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यात सकाळी 'श्री' च्या मुर्तीला अभिषेक करण्यात येतो. तर दररोज पुजा, भजन, कीर्तन, प्रवचन, महाआरती आदिसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचा श्रावण महिन्याची शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार तसेच या महिन्यात येणाऱ्या विविध सणा निमित्त नेहमीच भाविकांची गर्दी होत असते. भाविकांना उत्सव काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होवु नये सर्वांना श्री च्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी महादेव पंच कमिटी व महादेव भजनी मंडळा कडून तयारी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news