Dharashiv Crime : उमरग्याजवळ सव्वातीन कोटींचा गांजा जप्त

मराठवाड्यात चार ठिकाणी कारवाया; शेतजमीन, गायरानावर लागवड
Umarga Ganja Seizure
Umarga Ganja Seizurepudhari photo
Published on: 
Updated on: 

उमरगा : महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील हिप्परगारावाडी शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड उघडकीस आली. छत्रपती संभाजीनगर येथील अंमली पदार्थविरोधी पथक आणि उमरगा पोलिसांनी शुक्रवारी (दि. ९) दोन ठिकाणी छापे टाकून सहा क्विंटल ४२ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे तीन कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे.

पहिल्या कारवाईत कन्हैया भांगे यांच्या शेतातून तीन क्विंटल ४४ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे एक कोटी ७२ लाख रुपये आहे. दुसऱ्या कारवाईत शिवाजी यंपाळे यांच्या घराजवळील शासकीय गायरान जमिनीवर गांजाची लागवड आढळली. येथून दोन क्विंटल ९८ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे एक कोटी ४९ लाख रुपये आहे.

Umarga Ganja Seizure
Marathwada Graduate Constituency Election : आघाडीत फिसकटले; युतीचे बंड शमले

पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेने ही शेती उद्ध्वस्त करून पाच लाख २५ हजार रुपये किमतीचा १० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला.

  • परभणीजवळील वागदरी शिवारातही पोलिसांनी गांजाची ८२ झाडे जप्त केली. त्यांची अंदाजित किंमत १५ लाख ७५ हजार रुपये आहे. कंधार तालुक्यातील दिग्रस (बु.) शिवारात ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा १० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या शिवाय गाढे जळगाव येथे १८ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. मराठवाड्यात चार ठिकाणी गांजाची लागवड उघडकीस आल्याने बेकायदेशीर अंमली पदार्थ उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Umarga Ganja Seizure
Nana Patekar Upcoming Movies: नाना पाटेकरांचे पाच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news