Tuljapur illegal gambling : अवैध व्यवसायांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडणार

तुळजापूर : नगराध्यक्षांनी दिला पोलिस ठाण्याला इशारा
Tuljapur illegal gambling
अवैध व्यवसायांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडणारpudhari photo
Published on
Updated on

तुळजापूर : तुळजापूर शहरात मटका, जुगार, चक्री जुगार तसेच देहविक्रीसारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असून हे सर्व प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतात, असा सवाल उपस्थित करत नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी पोलिस प्रशासनाला जाब विचारला आहे. या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत तुळजापूर पोलिस ठाण्याकडे नगराध्यक्ष गंगणे व सत्ताधारी नगरसेवकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांत लहान टपऱ्यांमधून खुलेआम मटका व जुगार चालवला जात असून चक्री जुगाराचे अड्डेही सुरू आहेत. तसेच देहविक्री व्यवसायही वाढीस लागल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Tuljapur illegal gambling
Ambad ganja seizure : अंबड शहरालगत पोलिसांनी पकडला गांजा

या अवैध व्यवसायांमुळे समाजाचे मोठे नुकसान होत असून विशेषतः गरीब कुटुंबे आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे या सर्व व्यवसायांच्या मूळ सूत्रधारांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, तुळजाभवानी देवीचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर शहरात असे प्रकार घडणे चुकीचे असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचेही नगराध्यक्ष गंगणे यांनी नमूद केले आहे.

Tuljapur illegal gambling
Jal Jeevan Mission corruption : कारी येथे ‌‘जल जीवन‌’चा बोजवारा; भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या निवेदनावर रामचंद्र रोचकरी, नरेश अमृतराव, पंडित जगदाळे, विशाल रोचकरी, अमर हंगरगेकर, विशाल छत्रे, विजय कंदले, औदुंबर कदम, सागर कदम, लखन पेंदे, किशोर साठे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news