दर्शन मंडप मंदिर परिसरातच होण्यासाठी बुधवारी तुळजापूर ‘बंद’

तुळजापूर
तुळजापूर

तुळजापूर​, पुढारी वृत्तसेवा​ : तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी नव्याने होणाऱ्या दर्शन मंडपाच्या जागेच्या मागणीसाठी शहरवासीयांनी 11 ऑक्टोबररोजी बंदची हाक दिली आहे​. या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिलेले आहे.​ दर्शन मंडप मंदिर परिसरातच करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे.

राज्य शासनाच्या वतीने 1300 कोटी रुपयांचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नव्याने राबविण्यात येत आहे. यादरम्यान शहरवासीयांची मागणी राजे शहाजी महाद्वार आणि राजे जिजाऊ महाद्वार यांच्या समोरील विजय वाचनालय, प्रशासकीय इमारत, उंबर झराआणि त्याला नजीकच्या असणाऱ्या जागेवर नव्याने दर्शन मंडप उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ही जागा येणाऱ्या भक्तांसाठी आणि शहरवासीयांसाठी सोयीची आहे. हा विकास आराखडा तयार करीत असताना यासंदर्भात दोन वेळा पावर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यात आले. मात्र, हा दर्शन मंडप कोठे होणार आहे हे सांगितले गेले नव्हते.

8 ऑक्टोबररोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विकास आराखड्याच्या अनुषंगाने काही बाबींची जाहिरात करण्यात आली आहे. या विरोधात तुळजापूर येथील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी विरोध दर्शवला आहे. आपल्या मागणीसाठी 11 ऑक्टोबर रोजी तुळजापूर बंदची हाक दिली आहे.

या मागणीचे निवेदन महंत मावशीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे, माजी अध्यक्ष किशोर कांबळे, उपाध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संदीप गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सागर इंगळे, शशी नवले, अजय साळुंके आदींच्या या निवेदनात स्वाक्षरी आहेत. शांततेच्या मार्गाने तुळजापूर बंद राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news