तुळजाभवानीचा चैत्र महोत्सव ३० मार्च ते ३ एप्रिलदरम्यान

साडेतीन शक्तिपीठांपैकी एकअसलेल्या आई तुळजाभवानीचा चैत्र पौर्णिमा उत्सव ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे.
Tuljabhavani's Chaitra Festival
तुळजाभवानीचा चैत्र महोत्सव ३० मार्च ते ३ एप्रिलदरम्यानfile photo
Published on
Updated on

Tuljabhavani's Chaitra Festival to be held from March 30 to April 3.

तुळजापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एकअसलेल्या आई तुळजाभवानीचा चैत्र पौर्णिमा उत्सव ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. या काळात ३१ मार्च ते २ एप्रिलदरम्यान तुळजाभवानीचे मंदिर ३ दिवस दररोज २२ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. या तीन दिवसांत छबिन्याचे आकर्षण असणार आहे.

Tuljabhavani's Chaitra Festival
Maha ShivRatri | लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागेश्वर नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव साजरा!

तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा उत्सव कालावधीत राज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून १५ लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज आहे. यंदा भाविकांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत तीन लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे.

Tuljabhavani's Chaitra Festival
Machhindranath Fort : मच्छिंद्रनाथ गडावर लाखो भाविकांची उसळली गर्दी

देवस्थानच्या वतीने दिवसभराचे दर्शन झाल्यानंतर रात्रीच्या वेळी परिसराची स्वच्छता केली जाते. या शिवाय हळदी-कुंकू, खेळणी, पाळण्यांचे स्टॉल लावण्यात येत आहेत. पौर्णिमा उत्सवादरम्यान उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता लक्षात घेता मंदिर परिसरात शेडनेट टाकून सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news