आई राजा उदो उदो...! तुळजाभवानी देवीच्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ

Tuljabhavani Navratri | संबळाच्या कडकडाटामध्ये निघाली घटाची मिरवणूक
Tuljabhavani Navratri festival
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात संबळाच्या कडकडाटामध्ये घटाची मिरवणूक काढण्यात आली.Pudhari Photo
Published on
Updated on

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : आई राजा उदो उदो... सदानंदीचा उदो उदो... अशा जयघोषामध्ये आणि संबळ वाद्याच्या निनादात आज (दि.३) सकाळी ११ वाजता तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यात घटस्थापनेचा विधी संपन्न झाला. संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओबासे यांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने शारदीय नवरात्रौत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

Tuljabhavani Navratri festival
डॉ. सचिन ओबासे यांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने शारदीय नवरात्रौत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. Pudhari Photo

बुधवारी रात्री एक वाजता विधिवत व परंपरागत पद्धतीने शेज घरामध्ये सुरू असलेली तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची मूर्ती शेजघरातून मुख्य गाभाऱ्यांमधील चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. याप्रसंगी मानाच्या आरत्या करण्यात आल्या. दही दुधाचे अभिषेक करण्यात आले. देवीची आरती व नैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर भाविक भक्तांना तुळजाभवानी देवीचे धर्म दर्शन आणि मुखदर्शन सुरू झाले.

तुळजापूर येथून नवरात्र मंडळाचे पदाधिकारी भवानी ज्योत प्रज्वलित करून आपआपल्या गावी प्रस्थान करत होते. त्यांची मोठी गर्दी मंदिर परिसरात आणि महाद्वार परिसरात दिसून आली. सुमारे दोन तासांच्या अंतराने भाविकांना दर्शन मिळत राहिले. सकाळी सात वाजता नित्य अभिषेक संपन्न झाले. त्यानंतर देवीची आरती आणि नैवेद्य दाखविण्यात आला. शेकडो अभिषेक संपन्न झाल्यानंतर भाविक भक्तांचे मध्यरात्रीपासून सुरू असलेले दर्शन सुरू ठेवण्यात आले .

तत्पूर्वी अकरा वाजता घटस्थापना उत्सवाच्या निमित्ताने गोमुख तीर्थापासून घटाची मिरवणूक काढण्यात आली. देवीचा सिंह गाभारा, आदिमाया आदिशक्ती व यमाई मंदिर येथे विधिवत जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते घटस्थापना करण्यात आली. या घटस्थापनेसाठी लिंगायत समाजाचे मानकरी प्रफुल्लकुमार शेटे यांच्या शेतातील आठ विविध प्रकारचे धान्य आणले गेले.

यजमान सचिन ओंबासे , आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मंहत तुकोजी महाराज, पाळीचे पुजारी, तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन साळुंखे, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्ये मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, विपिन शिंदे धनंजय लोंढे, अविनाश गंगणे, पुजारी सचिन अमृतराव, प्रा. संभाजी भोसले, किशोर गंगणे, मधु गंगने, धनंजय लोंढे, श्रीराम अपशिंगेकर, मकरंद प्रयाग यांच्यासह इतर सर्व अधिकारी पुजारी व सेवेकरी मंडळी मोठ्या संख्येने दिवसभर झालेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.

तुळजापूर शहरामध्ये भाविकांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. ही गर्दी दुपारी दोन नंतर कमी झाली. दरम्यान, प्रसादाची दुकाने उपहारगृहे आणि लॉजिंग व्यवसाय तेजीत दिसून आला.

Tuljabhavani Navratri festival
Navratri Utsav | तुळजापूर, माहूर, अंबाजोगाईत नवरात्राची तयारी पूर्ण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news