Navratri Utsav | तुळजापूर, माहूर, अंबाजोगाईत नवरात्राची तयारी पूर्ण

रेणुकेच्या अलंकाराचे भाविकांना होणार दर्शन
Tuljapur Navratri Utsav
तुळजापुरात नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्णPudhari
Published on
Updated on

तुळजापूर : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला गुरुवार (दि.३) पासून सुरुवात होत आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवामध्ये गुरुवारी दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापना होईल. मंदिरात पुढील नऊ दिवस देवीचे वेगवेगळे उत्सव होतात. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधून भाविकांची मोठी गर्दी तुळजापुरात होते. एक ऑक्टोबरपासून घाटशिळ रोड येथे असणाऱ्या वाहनतळातून भाविकांच्या दर्शन रांगांना सुरुवात होईल. येथे धर्मदर्शन, मुखदर्शन व सशुल्क दर्शन, अभिषेक पूजेची रांग अशा वेगवेगळ्या रांगा असतील. भाविकांची सुरक्षिततेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुपारी बारा वाजता नवरात्राचे यजमान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्निक सिंह गाभाऱ्यात घटस्थापनेचा विधी होईल. दि. ४ रोजी देवीची नित्योपचार पूजा आणि भाविकांना दर्शन खुले राहील. दि. ५ रोजी मध्यरात्री १ वाजता चरण तीर्थ होणार असून सुमारे २० तास तुळजाभवानी देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

दि. ६ रोजी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्यरात्रीपासून दर्शन दिले जाईल. देवीची रथ अलंकार महापूजा केली जाईल. त्यानंतरच्या दिवशी मुरली अलंकार महापूजा, शेषशायी महालंकार, भवानी तलवार रूपातील पूजा, महिषासुरमर्दिनी आदी पूजाविधी होतील.

या काळात दररोज रात्री रात्री १० वाजता छबीना निघेल. दि. ११ या दिवशी वैदिक होमाला सुरुवात होईल. दि. १२ रोजी होमकुंडावरील धार्मिक विधी झाल्यानंतर घट उठवले जातील. १७ ऑक्टोबरला पौर्णिमेला तुळजाभवानीचे सीमोल्लंघन झाल्यानंतर घेण्यात आलेली श्रम निद्रा पूर्ण होते व देवीची मूर्ती पुन्हा चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येते. या दिवशी सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या काठा देवीच्या छबीन्यासाठी भाविक दाखल होतात.

सलग ३ दिवस देवीचा छबीना निघतो आणि शारदीय नवरात्र महोत्सव व पौर्णिमा हा धार्मिक कार्यक्रम पूर्ण होतो. नगर जिल्ह्यातील भिंगार येथून येणारी पलंग पालखी याच दिवशी मध्यरात्री २.३० वाजता तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणार आहे. याच दिवशी पहाटे ५.३० वाजता देवीचे ऐतिहासिक सोमोल्लंघन होईल. यावर्षी प्रशासनाच्या वतीने कुंकवाऐवजी फुलांची उधळण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओवासे यांनी केले आहे. १६ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आहे. १४ ते १६ हे तीन दिवस लाखो भाविकांची गर्दी तुळजापुरात असते.

श्रीक्षेत्र माहूर अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुरुवारी (दि.तीन) श्री रेणुकामाता घटस्थापना होत आहे. त्यानिमित्त मंदिर व्यवस्थापन व प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसर आणि रस्त्यावर स्वच्छता, रंगरंगोटी, डागडुजी, सुशोभीकरण आदी कामे सुरू केली असून, ती अंतिम टप्प्यात आहे. देवीला अभिषेक करून शृंगार आणि, वेगवेगळ्या रंगांचे महावस्त्र दररोज परिधान करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना दररोज वेगवेगळ्या रुपाने देवीच्या अलंकाराचे दर्शन होणार आहे. देवीचे पुरातन अलंकार संपूर्ण नवरात्र- मंदिरात ोत्सवात चढविले जाणार आहे.

नवरात्र उत्सवानिमित्त माहुरगडावर येणाऱ्या भाविकांना रेणुका मातेचे दर्शन सुलभरीत्या घेता यावे, यासाठी संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्या. सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत यात्रेशी निगडित असलेल्या विभाग प्रमुखांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार श्री रेणुकादेवी मंदिर

परिसरातील घाट वळणावरील झाडी झुडपांची तोड करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. मंदिराच्या पायरीवर कायम स्वरुपी छत उभारले असून जागोजागी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोकणवासीयांची कुलस्वामिनी

अंबाजोगाईची योगेश्वरी देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नवरात्र काळात कोकणातून येणाऱ्यांची संख्या मोठी असते. नवर- ात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर सजविण्यात आले असून, भाविकांना अडचण निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news