Tulja Bhavani Navratri Festival : नवरात्रौत्सवात ५० लालपरी धावणार, बसस्थानकांचे झाले नामकरण

नवीन बसेस घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर येथून धावणार
Tulja Bhavani Navratri Festival
Tulja Bhavani Navratri Festival : नवरात्रौत्सवात ५० लालपरी धावणार, बसस्थानकांचे झाले नामकरणfile photo
Published on
Updated on

Tulja Bhavani Navratri Festival: 50 buses will run during Navratri festival, bus stops have been named

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने तुळजा-पूरमधील मुख्य बसस्थानकाला 'श्री तुळजाभवानी बसस्थानक' तर नूतनीकरण करण्यात आलेल्या जुन्या बसस्थानकाला 'छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक' अशी नवी नावे देण्यात आली आहेत. याचबरोबर यात्रेच्या गर्दीवर ताण न येता भाविकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी तब्बल ५० नव्या लालपरी बसेस तुळजापूर आगारात दाखल होत आहेत.

Tulja Bhavani Navratri Festival
Dharashiv rain : मुसळधार पाऊस; खरीप पिकांचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत

स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्थांनी या संदर्भात परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुरावा केला होता. मंत्री सरनाईक यांच्या पुढाकारातून दोन्ही बसस्थानकाला नामकरण व नवीन बसेस यात्रा कालावधीत उपलब्ध झालेल्या आहेत.

नवीन बसेस घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर येथून धावणार असून, तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर-धाराशिव, तुळजापूर-लातूर, तुळजापूर-कोल्हापूर या मार्गांवर दररोज सुमारे २०० फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यात्रेच्या काळात लाखो भाविक तुळजापूरला भेट देतात.

Tulja Bhavani Navratri Festival
Dharashiv News: जानकापूर ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन; रस्ते-पुलाच्या दुरुस्तीची मागणी

त्यांची प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी या नव्या सुविधा सुरू होत आहेत. भाविकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असून, नवरात्र यात्रेदरम्यान यामुळे मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news