

The simmering internal conflict within the Congress persists in the BJP as well!
धाराशिव : भीमाशंकर वाघमारे आ. बसवराज पाटील आमदार झाल्यांतर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप नेते आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव नव्हते, तसेच त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. डॉ. पद्मसिंह पाटील राजकारणात सक्रिय असल्यापासून उभय नेत्यांमधील सुप्त संघर्ष भाजपतही कायम राहणार का याची चर्चा आहे.
म्हणजे, राज्यात दोन्ही काँग्रेस आघाडीची सत्ता असतानाही या नेत्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीला तेव्हा सत्तेपासून दूरच ठेवले. पुढे २००९, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीला मर्यादितच मदत केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कालांतराने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तर २०२४ मध्ये बसवराज पाटीलही भाजपमध्ये दाखल झाले. गेल्या वर्षी ते भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष झाले. विधान परिषदेवर आमदार म्हणून पुनर्वसन व्हावे यासाठी ते सतत . प्रयत्नशील होते.
अखेर गेल्या महिन्यात त्यांना संधी मिळाली. ते विक्रमी मतांनी आमदार झाल्याने रविवारी उमरग्यात बाउमरगा जनता सहकारी बँक तसेच श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या बँकेचे चेअरमन आ. बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील आहेत.
तर श्रमजीवी संस्था बसवराज पाटील यांच्याशी संबंधित आहे. असे असतानाही भाजपचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले राणाजगजितसिंह पाटील किंवा भाजपच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव मात्र निमंत्रण पत्रिकेवर नव्हते. आता त्यांना निमंत्रण दिले होते की हे नेतेच त्या दिवशी उपलब्ध नव्हते, यात न शिरता भाजपच्या दोन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नावे निमंत्रण पत्रिकेवर नसणे राजकीय चर्चाना खतपाणी घालणारे आहे.
बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांचे नाव होते. औशाचे आ. अभिमन्यू पवार यांचेही नाव पत्रिकेवर होते. आ. पवार यांनी तर बसवराज पाटील यांचा २०१९ मध्ये पराभव केला होता. या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळेच या दोन्ही राजकीय घराण्यांतील सुप्त राजकीय संघर्षाचा इतिहास नव्या पिढीसमोरही उगाळला जात आहे.