Dharashiv Sugarcane Harvesting : दुष्काळात हार्वेस्टरनेही हिरावला जनावरांचा चारा!

ऊसपाचट कुट्टी होऊन डंपरमध्ये; पशुपालक दुहेरी संकटात, जनावरे विकण्याची वेळ
Dharashiv Sugarcane Harvesting
हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी सुरू असल्याने पशुपालकांना वाड्याच्या चाऱ्यापासून मुकावे लागत आहे.pudhari photo
Published on: 
Updated on: 

ईट : एकीकडे दुष्काळाचे चटके तीव्र होत असताना दुसरीकडे ऊसतोडीसाठी हार्वेस्टरचा वाढता वापर ईटसह परिसरातील पशुपालकांसाठी नवे संकट ठरत आहे. पूर्वी मजुरांकडून ऊसतोडणी होताना जनावरांसाठी हिरवा वाडा उपलब्ध होत होता. मात्र, हार्वेस्टरमुळे ऊसपाला कुट्टी करून डंपरमध्ये जात असल्याने पशुपालकांच्या हातचा चारा हिरावला आहे. परिणामी, हजारो जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मजुरांच्या टंचाईमुळे साखर कारखान्यांकडून यांत्रिक ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून खरीप पिकांचेही नुकसान झाले आहे. रब्बीची पेरणीही पाण्याअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे चारा पिके उपलब्ध नसताना ऊसाच्या वाड्यांचाही आधार संपल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.

Dharashiv Sugarcane Harvesting
आंबेगावच्या पूर्व भागात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

विकतचा चारा परवडत नसल्याने दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटत आहे. चाऱ्याचे दर वाढल्याने काही शेतकरी जनावरे विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. हार्वेस्टरमधून निघणाऱ्या पाल्याचे संकलन करून तो नाममात्र दरात पशुपालकांना द्यावा, तसेच काही प्रमाणात हाताने ऊसतोडणीचा पर्याय ठेवावा, अशी मागणी होत आहे.

दुष्काळग्रस्त गावांत चारा छावण्या सुरू कराव्यात, चारा डेपो उभारावेत आणि साखर कारखान्यांनी सामाजिक उत्तर दायित्व निधीतून चारा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Dharashiv Sugarcane Harvesting
Onion Truck Fire : बाजारपेठेत पोहोचण्याआधीच कांद्याच्या १०० गोण्या आगीत खाक

जनावरे वाचविण्यासाठी उपाययोजना आवश्यक!

  • दुष्काळग्रस्त गावांत चारा छावण्या सुरू कराव्यात.

  • शासकीय दरात चारा डेपोमधून चारा उपलब्ध करावा.

  • पशुखाद्य खरेदीसाठी अनुदान द्यावे.

  • कारखान्यांनी हार्वेस्टरमधील पाल्याचे संकलन करून पशुपालकांना द्यावे.

  • हाताने ऊसतोडणीचा पर्यायही उपलब्ध ठेवावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.