Onion Truck Fire : बाजारपेठेत पोहोचण्याआधीच कांद्याच्या १०० गोण्या आगीत खाक

वाहनाला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Onion Truck Fire
Onion Truck Firepudhari photo
Published on: 
Updated on: 

भूम: कमी पाण्यावर काबाडकष्ट करून पिकवलेला कांदा विक्रीसाठी सोलापूरला घेऊन जात असताना वाटेतच आगीत जळून खाक झाला. वाहनाच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत कांद्याच्या तब्बल १०० गोण्या जळाल्या. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेसातच्या सुमारास बार्शी-सोलापूर मार्गावरील शेलगावजवळ ही घटना घडली.

भूम तालुक्यातील देवळाली येथील योगेश बजरंग बोटे यांनी कमी पाण्यावर कांद्याचे पीक घेतले होते. मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन जात होते. शेलगावजवळ वाहनात तांत्रिक बिघाड होऊन ते बंद पडले. त्याचवेळी वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले.

Onion Truck Fire
Beed Accident Case : माझा मुलगा गाडी चालवत नव्हता, अनुराग नाईकनवरे चालवत होता

चालक, शेतकरी आणि क्लिनर यांनी वाहनातून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला.काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. वाहनातील कांद्याच्या गोण्यांनी पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता अधिक होती. बार्शी अग्निशमन दलाचे पथक पोहोचेपर्यंत कांद्याच्या शंभर गोण्या जळून खाक झाल्या.

मेहनतीवर पाणी!

कमी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याचा विक्रीसाठी नेलेला कांदा डोळ्यांदेखत जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Onion Truck Fire
Diljit Dosanjh : दिल्ली-इंदूरनंतर आता बंगळुरूमध्ये दिलजीतच्या कॉन्सर्टला बॉम्बची धमकी; नेमकं काय घडलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.