

Stones pelted on Gokul Sugar truck demanding payment of pending bills
नळदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : गेल्या . वर्षीच्या ऊस गळीत हंगामातील ऊस क उत्पादक शेतकऱ्यांचे बील अद्याप न न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर, धोत्री (ता. दक्षिण व सोलापूर) या कारखान्याच्या उस वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्याची व घटना मैलारपूर खंडोबा मंदिर परिसरात । घडली. या घटनेमुळे परिसरात र तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांचा संताप तीव्र स्वरूप धारण करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्ग, येडोळा, वागदरी, शहापूर, र्व दहिटणा आदी भागातील शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर २०२४ मध्ये गोकुळ शुगर कारखान्याकडे ऊस घातला होता. मात्र हंगाम संपून जवळपास एक वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांना उसाचे संपूर्ण बील मिळाले नाही. काहींना प्रती टन ५०० ते २००० रुपये इतके अंशतः पैसे मिळाले असले तरी बहुसंख्य शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही.
शेतकरी अनेक वेळा कारखान्यावर गेले असता, मालक किंवा अधिकाऱ्यांकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने संताप वाढला. दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी गोकुळ शुगरचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम होणार असल्याने कारखान्याच्या गाड्या पुन्हा भागात दाखल झाल्या.
याचदरम्यान दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता शेतकऱ्यांनी ट्रक (एमएच २५ एयू ०३१६) वर दगडफेक करून काचा फोडल्या. शेतकऱ्यांनी दोन दिवसात थकीत उस बीले त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली असून, अन्यथा गोकुळ शुगरच्या उस वाहतूक करणाऱ्या गाड्या ग्रामीण भागात फिरू दिल्या जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.