राज्य सरकारच्या कृषिविषयक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक

पालकमंत्री प्रताप सरनाईक; श्री तुळजाभवानी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ
tuljapur political news
राज्य सरकारच्या कृषिविषयक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायकfile photo
Published on
Updated on

State government's agricultural schemes are beneficial for farmers

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा श्री तुळजाभवानी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे उपस्थित शेतकरी व अधिकारीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

tuljapur political news
Dharashiv News : पुण्यतिथीचा खर्च टाळून शाळेला ५१ हजारांची मदत

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, प्र. नगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी तसेच तुळजापूर येथील सर्व तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कृषी महोत्सवात विविध शासकीय योजना, पीकविमा, मृदा परीक्षण, सेंद्रिय शेती, आधुनिक सिंचन पद्धती, नवीन वाणांची माहिती, कीड व रोग व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शन देण्यात येत आहे.

कृषी विभागासह विविध कृषी संलग्न संस्थांचे स्टॉल उभारण्यात आले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली जात आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या उत्पत्रवाढीसाठी कटिबद्ध असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक पद्धतीतील बदल आणि मूल्यवर्धन यावर भर देणे गरजेचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

tuljapur political news
Dharashiv Liquor Ban| दारूबंदीसाठी दहिफळच्या महिला आक्रमक

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कृषी क्षेत्रातील नवकल्पना स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी महोत्सवाच्या उद्दिष्टांविषयी माहिती देताना सांगितले की, या उपक्रमातून शेतकऱ्यांना थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. महोत्सवाला जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित राहिले.

कृषी विषयक नव्या संकल्पना आणि तांत्रिक प्रगती यांची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. श्री तुळजाभवानीच्या पावन भूमीत आयोजित हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रगतीचा नवा मार्ग खुला करणारा ठरत असून जिल्ह्याच्या कृषी विकासाला चालना देणारा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news