Snakes mating dance | मुळज शिवारात सापांच्या प्रणयाचे दुर्मिळ दृश्य ; अर्धा तास विळख्यात रमली जोडी

बराच वेळ प्रणयक्रीडा सुरू ठेवल्यानंतर ही जोडी जवळील वेगवेगळ्या दिशेने झाडा झुडपांत निघून गेली
Snakes mating dance | मुळज शिवारात सापांच्या प्रणयाचे दुर्मिळ दृश्य ; अर्धा तास विळख्यात रमली जोडी
Published on
Updated on

शंकर बिराजदार

उमरगा : तालुक्यातील मुळज शिवारात नर-मादी सापांच्या प्रणयाचे दुर्मिळ आणि निसर्गरम्य दृश्य बुधवारी (दि.०३) दुपारच्या सुमारास पाहायला मिळाले. सुमारे अर्धा तास एकमेकांना घट्ट विळखा घालून रोमान्स करणाऱ्या या जोडीचे दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओची मोठी चर्चा रंगली आहे.

तालुक्यातील मुळज येथील शेतकरी तरुण भागवत नागेश बिराजदार हे शेताच्या बांधावरून जात असताना बाजूच्या नांगरलेल्या शेतातून आवाज आल्याने त्यांनी त्या दिशेने जाऊन पाहिले. त्यावेळी सुमारे सात ते आठ फूट लांबीची नर-मादी सापांची जोडी एकमेकांभोवती गुंडाळलेली दिसली. सुरुवातीला दोन्ही साप भांडत असल्याचा भास झाला; मात्र जवळून निरीक्षण केल्यावर ते प्रणयक्रीडेत मग्न असल्याचे लक्षात आले.

Snakes mating dance | मुळज शिवारात सापांच्या प्रणयाचे दुर्मिळ दृश्य ; अर्धा तास विळख्यात रमली जोडी
World Biodiversity Day : कोकणची जैवविविधता: निसर्गाचे वरदान,पण संकटाची टांगती तलवार

प्रत्यक्षदर्शी भागवत बिराजदार यांनी सांगितले की, ही जोडी सुमारे अर्धा तास एकमेकांना लिपटून होती. या काळात दोन्ही साप हवेत सुमारे दोन फूट उंच उड्या मारत विविध हालचाली करत होते. कधी कधी त्यांची शरीरे हवेत हेलकावे खात असल्याचेही दिसून आले. चित्रपटांमध्ये अशा प्रकारची दृश्ये पाहायला मिळतात; मात्र प्रत्यक्ष आयुष्यात असे दृश्य पाहणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगितले. बराच वेळ प्रणयक्रीडा सुरू ठेवल्यानंतर ही जोडी जवळील वेगवेगळ्या दिशेने झाडा झुडपांत निघून गेली.

Snakes mating dance | मुळज शिवारात सापांच्या प्रणयाचे दुर्मिळ दृश्य ; अर्धा तास विळख्यात रमली जोडी
Nanded news | दिल्लीतील जनजाती गर्जना रॅलीसाठी किनवटमधून १५०० आदिवासी प्रतिनिधी रवाना

दरम्यान समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हिडीओतील या अनोख्या आणि दुर्मिळ निसर्ग दृश्याची परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुळज येथे दिसलेली सापांची जोडी बिनविषारी धामण जातीची आहे. सापांची प्रणयक्रीडा हि कमीत कमी दिड तासांपेक्षा अधिक असते. तरीही नागरिकांनी कोणत्याही सापा जवळ जाणे टाळावे, सुरक्षित अंतर राखून वन्यजीवांचा आदर करणे आवश्यक असल्याचे वन्यजीव तज्ञांनी सांगितले.

Snakes mating dance | मुळज शिवारात सापांच्या प्रणयाचे दुर्मिळ दृश्य ; अर्धा तास विळख्यात रमली जोडी
Nagar Storm Rain Damage: नगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; कांदा-फळबागांचे मोठे नुकसान

उन्हाळ्याची सुरुवात आणि मान्सूनपूर्व कालावधी हा सापांच्या प्रजननाचा महत्त्वाचा हंगाम मानला जातो. या काळात साप बिळांमधून बाहेर पडून जोडीदाराच्या शोधात फिरताना दिसतात. अनेकदा लोक सापांच्या मिलन प्रक्रियेला नृत्य समजतात, मात्र ती त्यांच्या प्रजननाशी संबंधित नैसर्गिक जैविक प्रक्रिया असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यापासून अंतर राखणे अधिक योग्य ठरते.

राज धनकटे, सर्पमित्र, उमरगा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news