Tuljabhavani Temple: अशोभनीय वर्तन! तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, 3 महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदी?

तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता
Tuljabhavani Tempal
तुळजाभवानी मंदिर(File Photo)
Published on
Updated on

Show Cause Notice Priests in Tuljabhavani Temple

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या ८ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आढळून आले आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत, देऊळ कवायत कलम २४ व २५ अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे. मंदिर प्रशासनाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, पुजारी व्यवसायास अशा प्रकारचे वर्तन शोभणारे नसून, मंदिर परिसरातील पावित्र्याला बाधा पोहोचवणारे आहे. यामुळे मंदिराचे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होत आहे. शिस्तीचा भंग होत आहे.

Tuljabhavani Tempal
Osmanabad Railway Station Rename Dharashiv | उस्मानाबाद स्थानकाचे नाव आता धाराशिव रेल्वे स्थानक!

नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्यास तीन महिन्यांची मंदिर प्रवेश बंदी घालण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नोटीस मिळालेल्या पुजाऱ्यांची नावे:

वैभव विशाल भोसले, विशाल दादासाहेब मगर, लखन रोहिदास भोसले, विशाल हनमंत चव्हाण, विशाल बाळासाहेब गंगणे, अक्षय किशोर कदम-भैय्ये, राहुल हनुमंत पवार, धीरज राजू चोपदार या आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने कडक पावले

मंदिर प्रशासनाची कडक भूमिका श्री तुळजाभवानी मंदिर राज्यातील एक प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. अशा पवित्र जागी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणे, हे अत्यंत अशोभनीय आहे. भाविकांच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.

Tuljabhavani Tempal
Dharashiv Thackeray Shiv Sena |धाराशिव : अखेर ठाकरे शिवसेनेचे शिलेदार ठरले, जुन्या नव्यांना संधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news