Tulja Bhavani : शंकराचार्य भारती यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी बुधवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आरती केली.
Tulja Bhavani
Tulja Bhavani : शंकराचार्य भारती यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शनfile photo
Published on: 
Updated on: 

Shankaracharya Bharati had darshan of Tulja Bhavani

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा: श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी बुधवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आरती केली. दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Tulja Bhavani
Drought crisis impacts farmers and rural markets | बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट; आर्थिक चक्रात अडकला शेतकरी !

यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते शंकराचार्यांची पाद्यपूजा करण्यात आली. तसेच मंदिर संस्थानच्या वतीने देवीची प्रतिमा, कवड्याची माळ, शाल आणि महावस्त्र भेट देऊन महास्वामीजींचा सन्मान करण्यात आला.

Tulja Bhavani
FDA :भूमसह रत्नापुरात ७,७१६ किलो भेसळयुक्त खवा, रबडी जप्त

आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार प्रमुख पीठांमध्ये श्रृंगेरी शारदा पीठाचा समावेश असून, हे पहिले दक्षिणाम्नाय पीठ मानले जाते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, नगराध्यक्ष विनोद गंगणे, तहसीलदार अरविंद बोळंगे, माया माने, पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, सरकारी उपाध्ये बंडोपंत पाठक, नागेशशास्त्री अंबुलगे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांच्यासह पुजारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.