FDA :भूमसह रत्नापुरात ७,७१६ किलो भेसळयुक्त खवा, रबडी जप्त

धाराशिव जिल्ह्यात अन्न प्रशासनाची मोठी कारवाई
FDA
FDA :भूमसह रत्नापुरात ७,७१६ किलो भेसळयुक्त खवा, रबडी जप्तfile photo
Published on: 
Updated on: 

7,716 kg of adulterated khoya and rabri seized in Ratnapura, Bhum

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धाराशिव जिल्ह्यात खवा, रबडी आणि गुलाबजाम स्पेशल मिक्सच्या साठ्यावर धडक कारवाई केली आहे. भूम तालुक्यातील आंबी; पाटसांगवी तसेच कळंब तालुक्यातील रत्नापूर आणि येरमाळा परिसरातील तीन मोठ्या कारवायांमध्ये एकूण ७ हजार ७१६ किलो भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला असून, सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर खाद्य व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

FDA
Drought crisis impacts farmers and rural markets | बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट; आर्थिक चक्रात अडकला शेतकरी !

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने भूम तालुक्यातील आंबी आणि पाटसांगवी येथील दोन खवा सेंटर्सची तपासणी केली. आंबी येथील डेअरी फार्समधून ८३१ किलो साठा जप्त करण्यात आला; ज्याची किंमत २ लाख ६५ हजार ९२० रुपये आहे. विक्रम जाधव यांच्या उपस्थितीत हा साठा सील करण्यात आला. तसेच पाटसांगवी येथून ५० प्लास्टिक गोण्यांमधील २ लाख ३९ हजार ७६० रुपये किमतीचा ९९९ किलो खवा जप्त करण्यात आला. विना परवाना उत्पादन आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भरत दळवे यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. या दोन्ही ठिकाणांहून जप्त केलेल्या खव्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, संबंधितांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

दुसऱ्या कारवाईत, रत्नापूरजवळ (ता. कळंब) सोलापूर-धुळे महामार्गावर पिकअप वाहनावर छापा टाकून ८३८ किलो रबडी आणि २ हजार ७८ किलो गुलाबजाम स्पेशल मिक्स असा एकूण २ हजार ९१६ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. तसेच येरमाळा येथे सांगली आणि कोल्हापूर येथून पिकअप वाहनातून आणली जात असलेली तब्बल ३ टन (३ हजार किलो) रबडी पकडण्यात आली, तिची किंमतही सुमारे ५ लाख रुपये आहे. या कारवाईनंतर परिसरात झालेल्या कथित आर्थिक व्यवहाराच्या चर्चेमुळे पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

FDA
Dharashiv Crime News : तुळजापुरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून १८ वर्षीय तरुणाची हत्या

दिवाळीत मिठाई खरेदी करताय? सावधान !

दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणांहून जप्त केलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यावसायिकांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.