

Rs 12 lakhs stolen from Kunthalgiri Jain temple
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : भूम तालुक्यातील प्रसिद्ध कुंथलगिरी जैन मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे १२ लाख रुपयांची रोकड व पितळी मूर्ती चोरून नेल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री घडली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मंदिराच्या मुख्य गेटवरील कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे ९ लाख ते १२ लाख रुपयांची रोकड तसेच देव देवतांच्या पितळी मूर्ती असा एकूण अंदाजे १२ लाख १० हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला.
या प्रकरणी उमंग रवींद्र शहा (रा. कुंथलगिरी) यांनी वाशी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.