Bhoom Tehsil Office Protest : दुष्‍काळी स्‍थितीत शेतकरी, शेतमजुरांना आधार द्या...!

अवैध दारूविक्री बंदीसह विविध मागण्या; रिपाइंचा भूम येथे मोर्चा
Bhoom Tehsil Office Protest
भूम : विविध मागण्‍यांसाठी रिपाइंतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला. यात सहभागी नागरिक. निवेदन अधिकार्‍यांना देण्‍यात आले. pudhari photo
Published on: 
Updated on: 

भूम : शेतकरी, शेतमजूर, महिला आणि वंचित घटकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने भूम तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातून सहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. भूम शहरातील इंदिरानगर परिसरात जिल्हा परिषद शाळेपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारूविक्रीवर कारवाई करून संबंधित दुकानांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली.

Bhoom Tehsil Office Protest
Beed News : पैठण उजव्या कालव्याला ५ नोव्हेंबरपासून पाणी सुटणार

शेतकरी, व्यापारी व उद्योजकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, दिशा ठाणपीर परिसरातील गरीब महिलांची खासगी वित्तीय संस्थांकडून होणारी कर्जवसुली थांबवावी, तसेच गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दलित, आदिवासी व भटक्या समाजातील कुटुंबांना घरकुलासाठी जमिनीचे पट्टे द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. भूम ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच प्रसूतीपूर्व सोनोग्राफी, रक्त व लघवी तपासणी बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष संजय शिंदे, झुंबर गायकवाड, अशोक इंगळे, पांडुरंग गवळी, देविदास चंदनशिवे, पांडुरंग मृदुंगे, अमित गायकवाड, लक्ष्मण चंदनशिवे, भरत काळे, रुक्मिणी काळे, दीक्षा ठाणपीर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Bhoom Tehsil Office Protest
Chhatrapati Sambhajinagar Water Wastage : दुरुस्तीच्या नावाखाली टीव्ही सेंटर भागात लाखो लिटर पाणी गटारात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.