Crime News : मोटारसायकल घसरल्याने दरोडेखोर जाळ्यात

लोखंडी कत्ती, दोरी, दोन कटर जप्त, चार साथीदार फरार
dharashiv news
मोटारसायकल घसरल्याने दरोडेखोर जाळ्यात file photo
Published on
Updated on

Robbers Caught After Motorcycle Skids

वाशी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गोलेगाव शिवारातील सेरेंटिका कंपनीच्या पवनचक्की गोडाऊनवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीतील एक जण मोटारसायकल घसरल्याने पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याचे चार साथीदार फरार झाले आहेत.

dharashiv news
Dharashiv Crime News | पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलचे पैसे न देता पळणाऱ्या दोघांना बेड्या

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोडाऊनवर सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय कागदे व त्यांचे सहकारी १० एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास गस्त घालत असताना दोन विनानंबर मोटारसायकलींवरून पाच संशयित लोक तेथे आले. गार्डने बॅटरीचा प्रकाश टाकताच एकाने तलवारीसारखे हत्यार काढून त्यांच्याकडे धाव घेतली, तर इतरांनी दगडफेक करत गोडाऊनचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला.

गार्डने तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर गस्त घालणारे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला. पाठलागादरम्यान इंदापूर वळणावर एका मोटारसायकलचा अपघात होऊन एक जण जखमी अवस्थेत सापडला, तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

dharashiv news
Beed crime news | व्यापाऱ्याला लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

दुसऱ्या मोटारसायकलवरील तिघेही पसार झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव राहुल रामचंद्र काळे (रा. रामेश्वरवाडी, ता. केज, जि. बीड; सध्या रा. पारगाव, ता. वाशी) असे सांगितले. त्याच्याकडील सॅकमधून लोखंडी कत्ती, दोरी, मोठे व लहान कटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. फरार आरोपींची नावे राजू अर्जुन पवार, दादा शामराव काळे, चिवल्या उर्फ शिवाजी बप्पा काळे आणि बबन्या उर्फ बबन सोपान काळे अशी आहेत. या प्रकरणी सेक्युरिटी सुपरवायझर शिवहार राऊत यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न व घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news