Kurnoor Project : 'कुरनूर' च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

तुळजापूर : आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी
Kurnoor Project
Kurnoor Project : 'कुरनूर' च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवरFile Photo
Published on
Updated on

Repair work of 'Kurnoor' on war footing

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील पाणी वितरण व्यवस्था ५५ वर्षे जुनी आहे. दुरूस्तीअभावी अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागली होती. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाण्याचे वितरण होत नव्हते. परिणामी ३,५०० हेक्टर क्षेत्राला त्याचा फटका सहन करावा लागत होता.

Kurnoor Project
Tuljabhavani Temple: अशोभनीय वर्तन! तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, 3 महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदी?

वितरण व्यवस्थेत सुधारणा, अस्तरीकरण आणि बांधकाम दुरूस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून आपण मिळवून घेतलेल्या २९ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कामाची पाहणी करून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

या कामामुळे १० गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. दहा गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था ५५ वर्षे जुनी होती.

Kurnoor Project
Dharashiv Thackeray Shiv Sena |धाराशिव : अखेर ठाकरे शिवसेनेचे शिलेदार ठरले, जुन्या नव्यांना संधी

आजवर झालेला वापर, कालव्याची वेळेवर न झालेली दुरूस्ती, अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा विसर्ग ५० टक्क्‌यांवर आला होता. कालवा भरावातून, बांधकामातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याला गळती लागली आहे. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या भागात असलेल्या शेतकर्यापर्यंत उपलब्ध असलेले पाणी पोहोचण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. सिंचन अवर्तनाचा कालावधीही वाढल्याने सिंचन क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे निदर्शनास आले होते.

अनेक ठिकाणी शेवटच्या टोकाला कालवा बुजविला गेल्याचे स्थानिक शेतकरी बांधवांनी निदर्शनास आणून दिले होते. मागील ५५ वर्षांत या कालव्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे परिसरातील गावांना तोटा सहन करावा लागत आहे. अनेक शेतकरी बांधवांनी उपोषण केले. अनेकांनी आत्मदहनाचे पत्र दिले. रब्बी आणि उन्हाळी हंगामात कालव्याच्या नादुरूस्तीमुळे अनेकांच्या पिकाला पाणी मिळू शकले नाही.

त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, सिंचन क्षेत्रामध्ये झालेली घट दूर होवून सिंचन क्षेत्र वाढावे, याकरिता वितरण व्यवस्थेच्या अस्तरीकरण आणि त्यावरील बांधकाम दुरूस्तीसाठी महायुती सरकारकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासाठी तब्बल २९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यामुळे कालव्याच्या लाभ क्षेत्रातील वरील १० गावांमधील शेकडो शेतकरी बांधवांची मागणी महायुती सरकारमुळे पूर्ण झाली आहे. अस्तरीकरण आणि बांधकामाच्या कामाची निविदा ७ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. मागील ५० वर्षांपासून दुरूस्तीअभावी रखडलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे.

त्यामुळे या क्षेत्रातील शेतकर्यांना पुन्हा त्यांच्या हक्काचे पाणी लवकरच मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. कुरनूर मध्यम मध्यम प्रकल्पाच्या कालवा देखभाल आणि दुरुस्तीच्या अनुषंगाने पूर्ण लाईनींग करून सिमेंटचे लाईनींग करण्यात येणार आहे. याच बरोबर इतर जे कॅनाल आहेत त्याचे देखील काम दोन टप्यात घेण्यात येणार आहे.

टप्पा क्र. १ मध्ये कुरनूर मध्यम प्रकल्पाचा १० किमी मुख्य कालवाचे मातीकाम, त्यावरील बांधकामे व अस्तरीकरण करण्यात येत आहे. तसेच वितरिका, शाखा कालवा व लघु वितरिकांचे मातीकाम व त्यावरील बांधकामाचे एकूण २४.४३ किमी काम प्रगतितथावर आहे टप्पा क्र. २ मध्ये एकूण २०.८७ किमी मुख्य कालव्यावरील वितरिका, शाखा कालवा व लघु वितरीकांचे मातीकाम व त्यावरील बांधकामे करणे नियोजित आहे.

या धरणातून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मूळ नियोजनाप्रमाणे पाणी पोहोचणे अपेक्षित होते तिथपर्यंत पाणी पोहोचवण्याची सोय दोन टप्यात पूर्ण होणार आहे. येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. उर्वरित काम पुढच्या वर्षी घेण्याचा आपला प्रयत्न रा-हणार आहे. काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून जिथे गळती होती तिथे सिमेंटचे काम करण्याच्या आधी विशिष्ठ पद्धतीचे टेक्निकल टेक्स्टाईलचा पेपर वापरला जाणार असल्याचेही आमदार पाटील यांनीही संगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news