

Reels, short videos cause 'digital overload' on the brain
विकास उबाळे
कसबे तडवळे : मोबाईलवरील रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंमुळे तरुणाईच्या मेंदूवर 'डिजिटल ओव हरलोड' होत असून, त्याचा परिणाम स्मरणशक्ती, एकाग्रता आणि झोपेवर होत असल्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काही मिनिटांसाठी सुरू होणारे स्क्रोलिंग तासन्तास सुरू राहिल्याने मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही.
यामुळे मेंदूची झीज झपाट्याने होत आहे. आज केवळ लहान मुलेच नव्हे, तर तरुण, प्रौढ आणि वयोवृद्धही यामध्ये गुरफटले आहेत. शरीराला जितकी विश्रांती आवश्यक असते, त्याहून अधिक मेंदूला विश्रांतीची गरज असते. सतत चालू असलेली मोबाइलवरील स्क्रीन मेंदूंना एक मिनिटही विश्रांती देत नाही. त्यामुळे नवनवीन समस्या वाढत आहेत.
मायग्रेन आणि झो-पेच्या समस्या रील्स पाहण्याच्या सवयीमुळे जागरण वाढते, ज्यामुळे मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही. परिणामी, चिडचिडेपणा वाढतो. मोबाईलमधून निघणाऱ्या ब्लू लाइटमुळे मायग्रेन आणि झो-पेच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. काही प्रकरणांमध्ये अंधत्व येण्याचा धोकाही असतो.
पंचीवीस व तिशीत मेंदू विकार वाढत आहेत. सतत मोबाइलचा वापर, झोपेचा अभाव आणि मानसिक तणावामुळे वयाच्या तिशी आणि पस्तिशीच्या आत गंभीर मेंदू विकार होत आहेत. सतत स्क्रीन कडे पाहणामुळे डोकेदुखी, चक्कर, एकाग्रता कमी होणे या समस्या वाढत आहेत, याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर आणि मानसिक स्थैर्यावर होत आहे. डॉ. निखिल नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या वापरामुळे २५ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन आणि झटके येण्यासारखे गंभीर आजार वाढले आहेत. स्क्रीनमुळे डोकेदुखी, चक्कर या समस्याही वाढल्या आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे स्वमग्रता, दृष्टीदोष आणि अतिचंचलता यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्या मुलांमध्ये वाढत आहेत.
अशी घ्या काळजी
मोबाईलचा वापर कमी करा. दर २० मिनिटांनी २० सेकंदाचा ब्रेक घ्या. वाचन, खेळ यांसारख्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. सोशल मीडियावर रील्स पाहण्यासाठी वेळ निश्चित करा. आवश्यक असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. तज्ज्ञांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. नवले यांनी केले.